Join us
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक ! आशिकी’ फेम राहुल रॉयला पोलिसांनी मारले दंडुके? फोटो सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 13:22 IST

राहुल रॉय ‘द वॉक’सिनेमाच्या निमित्ताने रसिकांच्या भेटीला योतोय.  

लॉकडाऊनमध्ये  विनाकारण घराबाहेर पडणा-यांना पोलिसांचे दंडुके पडत असल्याचे आपण पाहिले. अजूनही लोक घराबाहेर पडताना काळजी घेत आहे. कामाव्यतिरिक्त बाहेर फिरण्यांर आजही पोलिसांची नजर असते. या भीतीमुळे अनेकजण अजूनही घरातच राहणे पसंत करत आहे. अशात सोशल मीडियावर  अभिनेता राहुल रॉयचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत राहुल रॉयला पोलिस अधिकारी मारताना दिसत आहेत. या फोटोत दिसणारा व्यक्ती हा राहुल रॉय आहे.तरीही अनेकांना त्याला ओळखणे कठिण जात आहे. 

फोटो पाहून चाहते संभ्रमात असले तरीही हा त्याचा आगामी सिनेमाच्या प्रमोशनचा भाग असल्याचे लगेच कळते. चाहत्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी खुद्द राहुल रॉयनेच हा फोटो शेअर केला आहे. ब-याच वर्षानंतर  राहुल रॉय ‘द वॉक’सिनेमाच्या निमित्ताने रसिकांच्या भेटीला योतोय.  सिनेमाच्या पब्लिसिटीसाठी राहुल रॉयने हा फोटो शेअर करताच सा-यांच्या नजरा त्याच्याकडे वळल्या आहे. प्रवासी मजदूर कामगारांवर हा सिनेमा आधारित असल्यामुळे लॉकडाऊनमध्ये मजुरांना आलेल्या समस्यांवर हा सिनेमा बनवण्यात आला असल्याचीही चर्चा रंगत आहे.  

राहुल रॉय म्हटले की डोळ्यासमोर येतो तो त्याचा 'आशिकी' सिनमा. 'आशिकी' हा सिनेमा नव्वदीच्या दशकात चांगलाच गाजला होता. या सिनेमातील सगळ्याच गाण्यांना रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. 30 वर्षाहून अधिक काळ झाला असला तरीही सिनेमातील गाणी आजही रसिकांच्या ओठावर रुळतात. सिनेमात राहुल रॉयनंतर सर्वाधिक चर्चा झाली ती अभिनेत्री अनू अग्रवालची. या दोघांची केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. या दोघां व्यतिरिक्त अभिनेता दीपक तिजोरीचीही भूमिका लक्षवेधी ठरली होती.  

टॅग्स :राहुल रॉय