मुंबई - बॉलिवूडमधील बहुचर्चित सिनेमा धुरंधर अखेर ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाला आहे. मात्र यानंतर सोशल मीडियावर एक अजब किस्सा व्हायरल होत आहे. त्यामुळे अनेक लोक संभ्रमात आहेत. रणवीर सिंग, संजय दस्त, अक्षय खन्ना यासारखे स्टारकास्ट असलेला धुरंधर सिनेमा Netflix वर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या क्रेडिट्समध्ये अचानक एक नाव सर्वांना आश्चर्यचकीत करणारे ठरले आहे. ते नाव म्हणजे Executive Producer राहुल गांधी..
राहुल गांधी हे नाव ऐकल्यानंतर बऱ्याच जणांच्या डोळ्यासमोर काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते यांचा चेहरा सगळ्यांना आठवतो. त्यामुळे तेच राहुल गांधी आता बॉलिवूडमध्ये फिल्म प्रोड्यूसर बनले की काय असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत सोशल मीडियात बऱ्याच मिम्स व्हायरल झाल्यात. इन्स्टाग्रामवर अनेक रिल्समधून राहुल गांधींच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधींनी राजकीय करिअरसोबतच फिल्म प्रोड्यूसर म्हणून कारकिर्द सुरू केलीय का असं लोक विचारू लागले आहेत. परंतु यामागचे सत्य भलतेच आहे.
धुरंधर सिनेमातून एक्झिक्युटिव्ह प्रोड्यूसर राहुल गांधी यांचे नाव ऐकून अनेक जण हैराण झाले. परंतु ज्या राहुल गांधींबाबत लोक विचार करत आहेत ते हे नाहीत. सिनेमा क्रेडिट्समध्ये नाव असलेले राहुल गांधी एक सीनिअर फिल्म प्रोड्यूसर आहेत. जे इंडस्ट्रीत दिर्घकाळापासून काम करतायेत. त्यांनी लकी भास्कर, वेदा, फर्जी, रॉकेट बॉयज, रुस्तमसारख्या अनेक हिट्स प्रोजेक्टमध्ये काम केले आहे. सिनेमात ज्या राहुल गांधींच्या नावाचा उल्लेख आहे त्यांचा राजकारणाशी काही संबंध नाही.
ओटीटीवर 'धुरंधर'ची धमाल
'धुरंधर'बाबत बोलायचे झाले तर आदित्य धर दिग्दर्शित हा अॅक्शन-ड्रामा चित्रपटगृहांमध्ये सुपरहिट झाला होता आणि नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाल्यानंतर आता तो पुन्हा चर्चेत आला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग मुख्य भूमिकेत आहे तसेच अक्षय खन्ना, आर. माधवन, अर्जुन रामपाल, संजय दत्त आणि सारा अर्जुन यासारख्या प्रमुख कलाकारांचीही भूमिका आहे. चित्रपटाच्या यशानंतर 'धुरंधर २' ची घोषणाही करण्यात आली आहे, जो १९ मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.
Web Summary : The movie 'Dhurandhar' credits a Rahul Gandhi as executive producer, leading to speculation it's the politician. However, it's a senior film producer with the same name, unrelated to politics. The action-drama is a hit on Netflix.
Web Summary : 'धुरंधर' फिल्म में राहुल गांधी का नाम कार्यकारी निर्माता के रूप में आने से अटकलें लगाई जा रही हैं कि क्या यह वही नेता हैं। लेकिन, यह एक वरिष्ठ फिल्म निर्माता हैं जिनका राजनीति से कोई संबंध नहीं है। फिल्म नेटफ्लिक्स पर हिट है।