‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’च्या नव्या प्रोमोत करिश्मा शर्माने ओलांडल्या बोल्डनेसच्या सीमा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2018 21:03 IST
एकता कपूरच्या ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’च्या वेबसिरीजचा नवा प्रोमो रिलीज करण्यात आला असून, त्यामध्ये करिश्मा शर्मा बोल्डनेसच्या सर्व परिसीमा ओलांडताना दिसत आहे.
‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’च्या नव्या प्रोमोत करिश्मा शर्माने ओलांडल्या बोल्डनेसच्या सीमा!
एकता कपूर जेव्हा तिची सुपरहिट वेबसिरीज ‘रागिनी एमएमएस’वर ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’ ही वेबसिरीज बनवित होती, तेव्हाच याबाबतचा अंदाज व्यक्त केला जातो की, ही वेबसिरीज पूर्णत: मनोरंजक असेल. आतापर्यंत या वेबसिरीजचे दोन प्रोमो आणि काही पोस्टर्स रिलीज करण्यात आले आहेत. दोन्ही प्रोमोमध्ये जरबदस्त बोल्ड सीन्सचा मारा केला गेल्याने चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली नसेल तरच नवल. या वेबसिरीजमध्ये मुख्य भूमिकेत असलेल्या करिश्मा शर्माने तर बोल्डनेसच्या सर्व सीमा पार केल्या आहेत. तिने ज्या पद्धतीने बोल्ड सीन्स दिले कदाचित दुसरी कोणतीही अभिनेत्री तिच्यासारखे धाडस करणार नाही. एकताने या वेबसिरीजसाठी हॉट अॅण्ड बोल्ड करिश्मा शर्माची निवड केली होती, तेव्हाच हे स्पष्ट झाले होते की, ही वेबसिरीज अगोदरच्या तुलनेत अधिक बोल्ड असेल. त्यातच करिश्माने ज्या पद्धतीने पोस्टर्सपासून टीजरपर्यंत आपल्या हॉट अदा दाखविल्या, त्यावरून प्रेक्षकांना सध्या या वेबसिरीजचे वेध लागले आहेत. आता या वेबसिरीजचे दुसरे टीजर रिलीज करण्यात आले असून, त्यामध्येही सेक्स आणि बोल्डनेसचा तडका लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. या टीजरच्या माध्यमातून एकता पुन्हा एकदा बोल्डनेसचा मारा करताना दिसत आहे. कारण यावेळेस करिश्मा शर्मा आणखीच बोल्ड दाखविण्यात आली आहे. ‘रागिनी एमएमएस रिटर्न्स’च्या दुसºया प्रोमोमध्ये करिश्मा आणि आणखी एक अभिनेत्री प्रचंड बोल्ड सीन्स देताना दिसत आहेत. दोघींनाही सेमिन्यूड सीनमध्ये दाखविण्यात आले आहे.