Join us

​‘रोडिज्’ फेम रघुरामचा पत्नी सुगंधासोबत घटस्फोट; लिहिली इमोशनल पोस्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2018 15:42 IST

एमटीव्हीचा लोकप्रीय शो ‘रोडिज्’चा जज राहुन चुकलेला रघुराम अलीकडे  भावूक झालेला दिसला. होय, रघुराम व त्याची पत्नी सुगंधा २०१६ ...

एमटीव्हीचा लोकप्रीय शो ‘रोडिज्’चा जज राहुन चुकलेला रघुराम अलीकडे  भावूक झालेला दिसला. होय, रघुराम व त्याची पत्नी सुगंधा २०१६ मध्येच विभक्त झाले होते. पण आता हे दोघे कायदेशीररित्या विभक्त झालेत. अलीकडे त्यांचा घटस्फोट झाला. रघुराम याने स्वत: ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. पण ही बातमी शेअर करताना तो बराच भावूक झालेला दिसला.   लग्नाच्या काही जुन्या फोटोंचा कोलाज शेअर करत रघुनामने एक इमोशनल पोस्ट लिहिली. ‘काही गोष्टी कधीच संपणार नाहीत. जसे की, तुझ्या व माझ्या मनातील प्रेम आणि एकत्र असताना आपण करतो ती धम्माल...काहीही संपणार नाही. केवळ बदल होतील आणि आयुष्याचा एक नवा टप्पा सुरु होईल,’ असे रघुरामने लिहिले आहे.रघुराम व सुगंधा या दोघांनी आपसी सहमतीने घटस्फोट घेतला. एका जुन्या मुलाखतीत रघुराम याबद्दल बोलला होता. मी आणि सुगंधा आम्ही दोघांनी आपसी सहमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. माझे व सुगंधाचे नात काळानुसार बदलत राहिले आहे. आज आम्ही कपल नाहीत. पण चांगले मित्र आहोत. मित्र झाल्यानंतर आम्ही आमच्या नात्याला एक संधी देण्याचा प्रयत्नही करून पाहिला.  तो प्रयत्न फसला. पण यातही आमची मैत्री मात्र कायम राहिली, असे रघुराम म्हणाला होता. २०१६ मध्ये रघुरामपासून विभक्त झाल्यावर सुगंधाही या विषयावर बोलली होती. वेगळे होण्याचा निर्णय आम्ही खूप विचारपूर्वक घेतला. अर्थात आम्ही आजही भेटतो. आता आमचे नाते आणखी खास झाले आहे, असे सुगंधा म्हणाली होती.रघुराम  रोडिज् आणि स्प्लिट्सविला या शोचा निर्माताही राहिला आहे. सध्या तो ‘एंटरटेनमेंट की रात’ या कार्यक्रमात बिझी आहे. सुगंधाने ‘जाने तू या जाने ना’ आणि ‘तेरे बिन लादेन’मध्ये काम केले आहे.