Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्री वेडिंग सोहळ्यात किंग खानबरोबर 'छम्मक छल्लो'वर थिरकली अंबानींची होणारी सून, शाहरुख-राधिकाचा व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2024 15:54 IST

राधिका मर्चंट आणि शाहरुख खानचा 'छम्मक छल्लो' गाण्यावर जबरदस्त डान्स, व्हिडिओ व्हायरल

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. १ ते ३ मार्चदरम्यान गुजरातमधील जामनगर येथे अनंत-राधिकाचा प्री वेडिंग सोहळा पार पडला. या सोहळ्याला बॉलिवूड, हॉलिवूडमधील सेलिब्रिटींसह अनेक दिग्गजांनीही हजेरी लावली होती. अंबानींच्या या सोहळ्यात बॉलिवूडचा किंग खान कुटुंबीयांसह उपस्थित होता. या सोहळ्यातील शाहरुख खानचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. 

अनंत-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यात शाहरुखने त्याच्या परफॉर्मन्सने चार चांद लावले. तर या निमित्ताने सलमान खान, आमिर खान आणि शाहरुख असे तीन खान पहिल्यांदाच एकत्र स्टेजवर थिरकताना दिसले. आता या सोहळ्यातील शाहरुखचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत शाहरुख आणि अंबानींची होणारी सून 'छम्मक छल्लो' या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. मानव मंगलानी यांच्या इन्स्टाग्राम पेजवरुन शाहरुख आणि राधिका मर्चंटचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. 

या व्हिडिओत राधिका मर्चंट आणि शाहरुख खान 'छम्मक छल्लो' या गाण्याच्या हुक स्टेप करताना दिसत आहेत. अंबानींच्या होणाऱ्या सुनेचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. दरम्यान, राधिका आणि अनंत अंबानीच्या प्री वेडिंग सोहळ्याची संपूर्ण देशभर चर्चा रंगली आहे. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी साखरपुडा केला होता. आता जुलै महिन्यात ते दोघंही लग्नबंधनात अडकणार आहेत. 

टॅग्स :शाहरुख खानमुकेश अंबानीनीता अंबानी