राधिका आपटेची शॉर्टफिल्म ‘क्रिती’ वादाच्या भोवऱ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 16:07 IST
शिरीष कुंदर दिग्दर्शित आणि राधिका आपटे अभिनीत अंगावर शहारे आणणारी शॉर्ट फिल्म ‘क्रिती’ आपण पाहिली असेलच.
राधिका आपटेची शॉर्टफिल्म ‘क्रिती’ वादाच्या भोवऱ्यात
शिरीष कुंदर दिग्दर्शित आणि राधिका आपटे अभिनीत अंगावर शहारे आणणारी शॉर्ट फिल्म ‘क्रिती’ आपण पाहिली असेलच. मात्र ही शॉर्ट फिल्म वादाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा सर्वत्र केली जात आहे. वाद असा आहे की, शिरिष कुंदरनं 'क्रिती' ही शॉर्ट फिल्म आपल्या एका शॉर्ट फिल्मच्या प्लॉटवरून चोरल्याचा दावा अनिल न्यूपान या एका फिल्ममेकरनं केलाय. अनिल न्यूपानची 'बॉब' ही नेपाळी शॉर्टफिल्म असून त्यातील कल्पना चोरुन ‘क्रिती’ ही शॉर्ट फिल्म तयार करण्यात आल्याचे त्याचे म्हणणे आहे. पहा तर मग आणि आपणच खरा खात्री की, क्रिती आणि बॉब मध्ये काय आहे साम्य.......