Join us
Daily Top 2Weekly Top 5

​राधिका आपटेने या अभिनेत्याला म्हटले ‘ओव्हररेटेड’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2018 14:46 IST

राधिका आपटे बॉलिवूडची एक गुणी अभिनेत्री. राधिका अलीकडे नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये पोहोचली. या शोमध्ये राधिकाने नेहाच्या प्रश्नांना बरीच ...

राधिका आपटे बॉलिवूडची एक गुणी अभिनेत्री. राधिका अलीकडे नेहा धूपियाच्या चॅट शोमध्ये पोहोचली. या शोमध्ये राधिकाने नेहाच्या प्रश्नांना बरीच मजेशीर उत्तरे दिलीत. यावेळी अभिनेता राजकुमार राव हाही तिच्यासोबत होता. बॉलिवूडचा सर्वात ओव्हररेटेड अ‍ॅक्टर कोण? असा प्रश्न राधिकाला विचारण्यात आला. यावर राधिकाने क्षणाचाही विचार न करता अभिनेता सुशांत सिंग राजपूतचे नाव घेतले.कुठल्या अभिनेत्याला जिम सेशनपेक्षा अ‍ॅक्टिंग क्लासेसची गरज आहे? असा आणखी एक प्रश्नही राधिकाला विचारण्यात आला. यावर राधिकाने सूरज पांचोलीचे नाव घेतले. राधिकाने एकीकडे अतिशय धीटाईने या प्रश्नांना उत्तरे दिलीत. याऊलट राजकुमार राव  काहीसी सावध भूमिका घेत, अनेक प्रश्न चतुराईने टाळताना दिसला. त्याने कुठल्याही सहकलाकाराचे नाव घेणे टाळले. तूर्तास राजकुमार राव ‘फन्ने खां’च्या शूटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन आणि अनिल कपूर यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. राधिका आपटेचे म्हणाल तर तिचा ‘पॅडमॅन’ हा सिनेमा येत्या २५ जानेवारीला रिलीज होतो आहे. यात सोनम कपूर व अक्षय कुमारही दिसणार आहेत. या चित्रपटात राधिकाने अक्षयच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.ALSO READ : Padman song Aaj Se Teri: !! पाहा, अक्षय कुमार - राधिका आपटेचा रोमॅन्टिक अंदाज!२००५ मध्ये राधिकाने  वाह, लाईफ हो तो ऐसी  या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर शोर इन द सिटी, कबाली, बदलापूर, मांझी- द माऊंटेन मॅन अशा अनेक चित्रपटांत राधिका दिसली आहे. हिंदी चित्रपटांशिवाय राधिकाने मराठी, तेलगू, तामिळ, मल्याळम चित्रपटातही काम केलेय. राधिकाची गणना मेनस्ट्रीम सिनेमाच्या टॉप मोस्ट अभिनेत्रींमध्ये होत नसली तरी तिची एक वेगळी फॅन फॉलोर्इंग आहे. दमदार अभिनयासाठी राधिका ओळखली जाते. तशीच एक बोल्ड अ‍ॅक्ट्रेस अशीही तिची ओळख आहे. तिच्या अनेक बोल्ड फोटोशूट आणि सीन्सवर वादंग माजले होते.