Join us

विक्रमादित्य मोटवानेने या अभिनेत्यासोबत केली राधिका आपटेची तुलना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 21:00 IST

यंदाचे वर्षं राधिकासाठी खूपच चांगले आहे असे आपण म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण या वर्षी तिचे अनेक चित्रपट आणि वेबसिरिज प्रेक्षकांना पाहायला मिळाले. राधिकाचे यंदाचे वर्षं पाहाता दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानीने तर तिची तुलना चक्क एका बॉलिवूडमधील अभिनेत्यासोबत केली आहे. 

राधिकाने पॅडमॅन, बदलापूर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले असून ती सध्या चित्रपटांपेक्षा वेबसिरीजला जास्त वेळ देत आहे. यंदाचे वर्षं राधिकासाठी खूपच चांगले आहे असे आपण म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. कारण या वर्षी तिचे अनेक चित्रपट आणि वेबसिरिज प्रेक्षकांना पाहायला मिळाले. राधिकाचे यंदाचे वर्षं पाहाता दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानीने तर तिची तुलना चक्क एका बॉलिवूडमधील अभिनेत्यासोबत केली आहे. 

राधिका २०१७ आणि २०१८ या दोन्ही वर्षांत प्रचंड बिझी असल्याचे पाहायला मिळाले. तिने ओर्मेटा, फन्ने खान यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले असून तिचा लव्ह सोनिया हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिच्या नुकत्याच भेटीस आलेल्या लस्ट स्टोरीज आणि घोल या वेबसिरिजची चांगलीच चर्चा झाली होती. राधिकाचे हे यश पाहाता विक्रमादित्यने तिची तुलना चक्क राजकुमार राव सोबत केली आहे. या वर्षांत राधिकाने अनेक चित्रपट, बेवसिरिजमध्ये काम केले असून वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यामुळे यंदाची ती राजकुमार राव आहे असे विक्रमादित्यने म्हटले आहे. 

नेटफ्लिक्सवरील लस्ट स्टोरीज, सेक्रेड गेम्स आणि घोल या तिन्ही सीरिजमध्ये राधिका आपटेची भूमिका आहे. या तिन्ही वेबसिरिजच्या टीममध्ये विक्रमादित्यचा समावेश आहे. त्यामुळे विक्रमादित्य आणि राधिका यांचे खऱ्या आयुष्यात आणि व्यवसायिक आयुष्यात ट्युनिंग खूपच चांगले आहे. 

लस्ट स्टोरीजमध्ये कालंदी, सेक्रेड गेम्समध्ये अंजली माथुर आणि घोलमध्ये निदा रहिम अशा भूमिका राधिका आपटेने साकारल्या आहेत. आजकाल ती नेटफ्लिक्सच्या सगळ्याच सिरिजमध्ये दिसत असल्याने नेटफ्लिक्स आणि राधिका हे एक समीकरणच बनले आहे आणि पण यावरूनच तिची सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी टर उडवली गेली होती. राधिका आपटे नेटफ्लिक्सची सूर्यवंशम असल्याचे नेटिझन्सनी म्हटले होते. पण राधिका आणि नेटफ्लिक्सने मिळून या ट्रोलना चांगलेच उत्तर दिले होते. सोशल मीडियावर राधिकाला करण्यात आलेल्या ट्रोलकडे राधिका आणि नेटफ्लिक्सने अतिशय सकारात्मक दृष्टीने पाहिले होते.  

टॅग्स :राधिका आपटे