Join us  

या प्रसिद्ध अभिनेत्रीकडे नाहीय तिच्या लग्नातील एकही फोटो, म्हणाली-आमचे मित्र फोटोग्राफर होते, पण त्यांनी.....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 07, 2023 10:17 AM

तिचे फॅन्स आज जगभर आहेत. बोल्ड आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत ती प्रसिद्ध आहे.

बॉलिवूडची बोल्ड अ‍ॅण्ड ब्युटिफुल अभिनेत्री राधिका आपटे (Radhika Apte) हिची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. आपल्या आत्तापर्यंतच्या फिल्मी करिअरमध्ये राधिकाने एकापेक्षा एक हिट चित्रपट दिले आहेत. राधिकाचा जन्म ७ सप्टेंबर १९८५ रोजी झाला. आज तिचा वाढदिवस आहे. ती आज ३८ वर्षांची झाली. राधिका आपटेला लहानपणापासूनच अभिनेत्री बनायचे होते. मात्र, चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर तिने लंडनमध्ये ब्रेक घेऊन नृत्य शिकण्याचा निर्णय घेतला. राधिकाचे फॅन्स आज जगभर पसरलेत. बोल्ड आणि बिनधास्त म्हणून चित्रपटसृष्टीत प्रसिद्ध आहे. आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त आणि बेधडकपणे मांडणे, कुणाचीही विशेषतः लोक काय विचार करतील याचा विचार न करता व्यक्त होणारी एक रोखठोक अभिनेत्री अशी राधिका आपटे हिची ओळख. 

राधिकाच्या फिल्मी करिअरबद्दल सगळ्यांनाच ठाऊक आहे. पण तिच्या पर्सनल लाईफबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. राधिका विवाहित आहे. 2012 साली राधिकाने लंडनमध्ये स्थायिक व्हायोलिनवादक व संगीतकार बेनेडिक्ट टेलरसोबत ( Benedict Taylor) लग्न केलं. राधिका व बेनेडिक्ट 2011 मध्ये पहिल्यांदा भेटले होते. डान्स शिकण्यासाठी राधिका लंडमध्ये गेली होती. इथेच त्यांची ओळख झाली आणि लवकरच राधिका व बेनेडिक्ट एकत्र राहू लागले. 2012 मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा छोटाशा विवाह सोहळा पार पडला होता. पण या लग्नाचा एकही फोटो राधिकाकडे नाही.

फोटो क्लिक करणार कोण?राधिकाने सांगितलं की, दहा वर्षांपूर्वी माझं व बेनेडिक्टचं लग्न झालं, त्यावेळी आम्ही फोटो क्लिक करायलाच विसरलो. आम्ही आमच्या जवळच्या मित्रमंडळींच्या उपस्थित लग्न केलं होतं. लग्नात अगदी मोजकी माणसं होती. आम्ही स्वत:चं जेवण बनवलं होतं. इंग्लंडमधील एका ठिकाणी आम्ही लग्न केलं. तिथेच पार्टी केली. इतकं सगळं झालं पण आम्ही फोटो काही काढले नाही. लग्नात हजर आमचे अर्धे अधिक मित्र उत्तम फोटोग्राफर होते. तरीही त्यांनी आमचे फोटो काढले नाहीत. आम्ही सुद्धा फोटो काढा, असं त्यांना म्हटलं नाही. कारण आम्ही सगळेच नशेत होतो. मग फोटो काढणार कोण? म्हणून माझ्या लग्नाचा एकही फोटो माझ्याकडे नाही.

टॅग्स :राधिका आपटे