Join us
Daily Top 2Weekly Top 5

राधिका आपटेने ट्रोलर्सला दिले उत्तर; म्हटले, ‘बीचवर मी साडी घालून जायला हवे काय?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 16:49 IST

अभिनेत्री राधिका आपटे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर सातत्याने ट्रोल्स होत आहे. आता राधिकाने ट्रोलर्सला उत्तर दिले असून, ‘बीचवर मी साडू घालून जायला हवे काय?’ असा प्रश्न केला आहे.

‘पॅडमॅन’ अभिनेत्री राधिका आपटे सोशल मीडियावर जबरदस्त अ‍ॅक्टिव्ह असून, नित्यनियमाने ती चाहत्यांसाठी तिचे फोटो शेअर करीत असते. काही काळापूर्वीच राधिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक बिकिनी फोटो शेअर केला. फोटोमध्ये राधिका हातात वाइनचा ग्लास घेऊन उभी असल्याचे दिसत होते. मात्र युजर्सला राधिकाचा हा अंदाज अजिबातच भावला नाही. त्यांनी तिला या फोटोवरून ट्रोल करण्यास सुरुवात केली. युजर्सनी तिच्या या फोटोला कॉमेण्ट करताना लिहिले की, ‘तुला देशातील तरुण पिढी फॉलो करते निदान याचे तरी तू भान ठेवायला हवे’ तर काही लोकांनी लिहिले की, ‘तुझे खासगी आयुष्य सार्वजनिक करू नकोस’ मात्र राधिकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत या ट्रोलर्सला रोखठोक उत्तर दिले. राधिकाने डीएनएशी बोलताना म्हटले की, ‘कोणी काही म्हटले म्हणजे मी ट्रोल होणार काय? हा सर्व बावळटपणा आहे. लोकांना माझ्याकडून ही अपेक्षा आहे काय की, मी बीचवर साडी परिधान करून जावे?’ यावेळी राधिकाला ‘तू अशी परिस्थिती कशा पद्धतीने हाताळतेस?’ असे विचारण्यात आले तेव्हा तिने म्हटले की, ‘मला माहीत नाही, पण मी अशा लोकांसोबत कुठल्याही प्रकारची डील करू इच्छित नाही. खरं राधिकाप्रमाणे इतरही बºयाचशा अभिनेत्री आहेत, ज्यांना आपल्या बिकिनी फोटोवरून ट्रोलर्सच्या संतापाचा सामना करावा लागला.  राधिकाने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना हॅशटॅगसह कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हॉलिडे, टाइम आॅफ गोवा, समुद्र आणि मित्र’ फोटोमध्ये राधिका तिच्या मित्रांसोबत बघावयास मिळत आहे. मात्र राधिकाचा हा फोटो काही नेटकºयांना अजिबातच भावला नाही. त्यांनी लिहिले की, ‘पॅडमॅनमध्ये पाहा अन् आता हिला पाहा’ अन्य एका यूजरने लिहिले की, ‘असे कोणासोबत कुठेही बसत जाऊ नकोस’. राधिका नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘पॅडमॅन’ या चित्रपटात बघावयास मिळाली होती. चित्रपटात तिने अक्षयकुमारच्या पत्नीची भूमिका साकारली होती. राधिकाच्या या भूमिकेचे प्रेक्षकांनी चांगलेच कौतुकही केले होते.