Join us

राधिका आपटेने कोरोना काळात कोलकतामध्ये 'मिसेस अंडरकव्हर'चे शूटिंग केले पूर्ण, सांगितला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2021 16:14 IST

अभिनेत्री राधिका आपटे हिने नुकतीच 'मिसेस. अंडरकव्हर' या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती.

अभिनेत्री राधिका आपटे हिने नुकतीच 'मिसेस. अंडरकव्हर' या आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली होती. लॉकडाउन होण्यापूर्वी अभिनेत्रीने कोलकतामध्ये चित्रपटाचे ४५ दिवसांचे शेड्युल पूर्ण केले. कोरोना काळातील आरोग्याची गंभीर स्थिती पाहता, यामध्ये कुणाचेच दुमत नसेल की या चित्रीकरणाचा अनुभव कसा असेल.  

राधिकाने स्वत:च याविषयीचा खुलासा केला, ती म्हणाली, "अनुभव काही वेगळा नव्हता, आम्ही वारंवार कोरोना चाचण्या करत होतो. आम्ही सगळेच जण तिथे बरीच सावधगिरी बाळगत होतो आणि आरोग्य व सुरक्षा नियमांचे तंतोतंत पालन करत होतो. त्याशिवाय इतर सर्व काही अगदी सारखेच होते."

शूटिंग दरम्यान अभिनेत्रीने सर्व आवश्यक ती सावधगिरी बाळगली. हॉटेलपासून लोकेशनपर्यंत फक्त तेवढाच आवश्यक प्रवास करण्यात आला असून चित्रिकरणाशी संबंधित नसलेल्या सर्व गोष्टी पूर्णपणे रद्द केल्या गेल्या होत्या. 

राधिका आपटे सध्या यशाच्या शिखरावर असून तिच्याकडे  अनेक मुख्य मासिकांची मुखपृष्ठे आहेत तसेच, 'ओके कॉम्प्यूटर' या वेब सीरिजमध्ये तिच्या अभिनयाबद्दल कौतुक झाल्यानंतर राधिका, भविष्यात लवकरच काही प्रमुख चित्रपटांमध्ये दिसणार आहे, ज्यामध्ये ‘मिसेस अंडरकव्हर’ आणि काही अघोषित प्रकल्पांचा सहभाग आहे.

राधिका तिच्या वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्यामध्ये ताळमेळ घालण्याचा नेहमीच प्रयत्न करत असते. तिचे लग्न झाले असून तिचा नवरा परदेशात असतो. राधिकाने हिंदी चित्रपटाशिवाय मल्याळम, बंगाली, मराठी आणि तमीळ सिनेमातही काम केलं आहे. तसेच अनेक वेबसिरिजमध्ये देखील ती झळकली आहे.

टॅग्स :राधिका आपटेकोरोना वायरस बातम्या