Join us
Daily Top 2Weekly Top 5

"पाठीवर वार करुन त्यांनी..."; 'राझी'मधील अभिनेत्यावर इंस्तांबुलमध्ये चोरांनी केला प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2024 11:36 IST

आलिया भटच्या राझी सिनेमात काम केलेल्या अभिनेत्यावर इंस्ताबुलमध्ये चोरट्यांनी हल्ला केल्याचा भयावह अनुभव समोर आलाय (alia bhat, raazi)

आलिया भटचा 'राजी' सिनेमा चांगलाच गाजला. मेघना गुलजार दिग्दर्शित या सिनेमाचं सगळीकडे खूप कौतुक झालं. विकी कौशल - आलिया भट यांच्या केमिस्ट्रीचीही बरीच चर्चा झाली. या सिनेमातील अभिनेत्यावर इंस्तांबुल देशात चोरांनी हल्ला केलाय. अचानक ओढवलेल्या या प्रसंगामुळे अभिनेत्याला अडचणींना सामोरं जावं लागलं. या अभिनेत्याचं नाव अश्वत्थ भट. अश्वथ यांनी चोरट्यांचा जो अनुभव आला तो सर्वांना सांगितलाय. 

अश्वथ भट यांना चोरट्यांनी लुटलं

अश्वथ यांनी ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेबद्दल सांगितलं. अश्वथ म्हणाले, "मी गलाटा टॉवरच्या दिशेने जात होतो. त्याचवेळी एक माणूस माझ्याजवळ आला. मला काही कळायच्या आधीच त्याने माझ्या पाठीवर वार केला. मी मागे वळून पाहिलं तर एक मोठी गँग होती. त्यांनी एकत्र येऊन माझी बॅग खेचण्याचा प्रयत्न केला. एक सेकंद माझ्यासोबत काय होतंय हे मला कळलंच नाही."

कॅब ड्रायव्हर मदतीला आला अन्...

अश्वथ भट पुढे म्हणाले, "त्यांना वाटलं असेल की मी त्यांचा प्रतिकार करणार नाही. पण ही घटना घडत असतानाचा एक कॅब ड्रायव्हर मध्येच येऊन थांबला. त्याने या गुंडांपासून माझा बचाव केला. चोर तुर्की भाषेत काहीतरी म्हणाले आणि निघून गेले. मला झालेली जखम बघून कॅब ड्रायव्हरने मला तत्काळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवण्यास सांगितलं." ही घटना घडल्यानंतर अश्वत्थ यांनी पर्यटन स्थळी गेल्यावर चोरट्यांपासून सावध राहण्याचा सल्ला सर्वांना दिलाय. 

 

टॅग्स :राझी सिनेमाआलिया भटमराठी