Join us

​आर माधवनच्या खांद्याचे झाले ऑपरेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2018 17:37 IST

आर माधवनने त्याच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. आजवर त्याने रहना है तेरे दिल मैं, रंग ...

आर माधवनने त्याच्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. आजवर त्याने रहना है तेरे दिल मैं, रंग दे बसंती, थ्री इडियट्स, तन्नू वेड्स मन्नू यांसारखे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दाक्षिणात्य इंडस्ट्रीमध्ये तर त्याला सुपरस्टार ही पदवी मिळाली आहे. अनेक वर्षं चित्रपटात काम केल्यानंतर आता माधवन वेबसिरिजकडे वळला आहे. त्याची ब्रीथ ही वेबसिरिज सध्या चांगलीच गाजत आहे. आर माधवन त्याच्या सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. त्यामुळे त्याचे अनेक फॅन्स त्याला सोशल मीडियावर फॉलो करत असतात. त्याने आज त्याच्या सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केलेल्या एका फोटोमुळे त्याच्या फॅन्सना आश्चर्याचा धक्का बसला आहे.आर. माधवनने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये तो हॉस्पिटलच्या बेडवर झोपलेला दिसत असून त्याच्या हाताला सलायन लागलेले आहे. या फोटोसोबत माधवनने लिहिले आहे की, माझ्या खांद्याचे नुकतेच ऑपरेशन झाले आहे. फायटर पुन्हा कामावर रूजू होणार आहे. माझ्या उजव्या खांद्याला काही संवेदनाच नाहीत असे मला वाटत आहे. माधवनचा खांदा गेल्या कित्येक दिवसांपासून दुखत आहे. पण तो त्याच्या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने ऑपरेशनसाठी त्याला वेळच मिळत नव्हता. पण खांद्याचे दुखणे खूपच वाढल्यामुळे त्याने आता खांद्यावर शस्त्रक्रिया करून घेतली आहे. रहना है तेरे दिल में' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आर माधवनला एक वेगळीच लोकप्रियता मिळवून दिली होती. या चित्रपटामुळे त्याचा एक फॅन क्लब तयार झाला. या चित्रपटातील सगळीच गाणी हिट झाली होती. माधवन नावाचा नवा स्टार बॉलिवूडला या चित्रपटाने मिळवून दिला. माधवन आता एका ऐतिहासिक चित्रपटात झळकणार असून या चित्रपटात त्याची जोडी सैफ अली खानसोबत जमणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थान, मुंबई आणि उत्तर प्रदेशामध्येमध्ये होणार आहे. माधवनची तब्येत सुधारल्यानंतर तो या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. Also Read : आर माधवनने दिवाळीनिमित्त खरेदी केली ४० लाखाची मोटरसायकल...