Join us

आर. माधवनचा 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 17:54 IST

अभिनेता आर. माधवन लवकरच एका सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव आहे 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट'.

ठळक मुद्दे'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट' चित्रपटाचा टिझर ३१ ऑक्टोबरला होणार रिलीज

 

अभिनेता आर. माधवन लवकरच एका सिनेमातून रसिकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाचे नाव आहे 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट'. हा सिनेमा हिंदी, तामिळ आणि इंग्रजी भाषेत रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा टीझर लवकरच प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाबाबतची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असताना  चित्रपट काय आहे याबद्दलची उत्सुकता वाढवणारे निवेदन एका व्हिडिओतून माधवनने केले आहे.

या व्हिडिओत आर. माधवन म्हणला की, 'जगात अनेक कथा आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असेल. पण अशा अनेक कथा आहेत ज्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसेल. या कथा तुम्हाला माहिती नाहीत याचा अर्थ तुम्हाला देशाबद्दल काही माहिती नाही. नंबी नारायण यांची एक अशी कथा आहे, ज्याबद्दल तुम्ही ऐकाल किंवा त्या माणसाने साध्य केलेल्या गोष्टी जेव्हा पाहाल तर खात्री बाळगा तुम्हाला बोलल्या शिवाय राहवणार नाही. 'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट'. आपल्या देशाची एक अशी कथा ज्यांना माहिती नाही त्यांना कळेल, ज्यांना वाटते की त्यांना माहिती आहे ते चकित होतील.' 

'रॉकेट्री - द नंबी इफेक्ट' चित्रपटाचा टिझर ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजून ३३ मिनीटांनी रिलीज केला जाणार आहे.

टॅग्स :आर.माधवन