Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर माधवन ४ वर्ष इंडस्ट्रीतून होता गायब? पत्नीने विचारलेल्या 'त्या' प्रश्नानंतर घेतलेला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 11:14 IST

आर माधवनने ब्रेकमध्ये नक्की केलं काय? म्हणाला...

अभिनेता आर माधवन चाहत्यांमध्ये 'मॅडी' नावाने ओळखला जातो. आपल्या प्रत्येक भूमिकेतून तो प्रेक्षकांवर छाप पाडतो. नुकतंच 'धुरंधर'मध्ये त्याने आयबी चीफची भूमिका साकारली. २०११ साली आर माधवनने करिअरमधून ब्रेक घेतला होता. त्यानंतर त्याने थेट २०१६ मध्ये 'साला खडूस'मधून कमबॅक केले होते. हा सिनेमा त्याच्या रोमँटिक हिरोच्या भूमिकेपेक्षा खूप वेगळा होता. आता नुकतंच त्याने करिअरमधील त्या ब्रेकबद्दल खुलासा केला.

अनफिल्टर्ड एंटरटेनमेंटला दिलेल्या मुलाखतीत आर माधवन म्हणाला,"विक्रम वेधा सिनेमा मला एका ब्रेकनंतर मिळाला होता. साला खडूसआधी मला ब्रेक घ्यावा लागला होता. कारण मी ज्याप्रकारचं काम करत होतो त्यात मी खूश नव्हतो. स्वित्झर्लंडमधील तमिळ गाण्यासाठी मी नारंगी रंगाची पँट आणि हिरव्या शर्टमध्ये शूटिंग करत होतो. मी रस्त्याच्या मधोमध होतो आणि तेथील एक स्विस शेतकरी माझ्याकडे रागाने पाहत होता. तो चहास पित होता आणि आम्ही हे काय करतोय बघत होता. मी मनात विचार केला की तू चेन्नईला ये आणि बघ मी कोण आहे. पण त्यानंतर मला वाईट वाटल. मला हे जाणवलं की मी दुसऱ्यांच्याच तालावर नाचत काम करत आहे. मी एक पब्लिक स्पीकर आहे. मला बंदूक चालवता येते, रिमोट प्लेन उडवता येतं, घोडेस्वारी येते आणि बरंच काही येतं. पण स्वत:च्याच सिनेमात मी यातलं काहीच करत नाहीये."

तो पुढे म्हणाला, "मी फक्त प्रेक्षकांना भुलवण्याचाच प्रयत्न करत होतो. ज्यात मी एक सुपरस्टार असतो. मला तेव्हा माझ्या चुकीची जाणीव झाली. ज्या भूमिका मी करत होतो ज्यात मी एक भूकेला, अशिक्षित गावातला मुलगा ज्याला क्रिकेटमध्ये करिअर करायची इच्छा असते. अशा मुलाच्या भूमिकेत असतो."

"एक दिवस माझ्या पत्नीने मला विचारलं की तुला काय झालंय? तू इच्छा नसताना कामावर जातोय असं  वाटतं. तिच्या बोलण्यात तथ्य होतं. म्हणूनच मी ब्रेक घेतला. देश कोणत्या दिशेला जातोय हे मला समजून घ्यायचं होतं. मी जाहिराती करणंही बंद केलं. दाढी वाढवली. चेन्नई आणि भारतातील इतर ठिकाणी फिरलो. रिक्षावाल्यांशी गप्पा मारल्या. खूप फिरलो, सगळ्याचं निरीक्षण केलं आणि त्यानंतरच मी पुन्हा सिनेमात येण्याचा निर्णय घेतला.", असंही आर माधवन म्हणाला.

English
हिंदी सारांश
Web Title : R Madhavan's four-year industry hiatus: Wife's question sparked decision.

Web Summary : R Madhavan took a break from acting, feeling creatively unfulfilled. His wife's observation about his unhappiness prompted soul-searching. He traveled, observed India, and returned with renewed purpose, choosing roles aligned with his values.
टॅग्स :आर.माधवनबॉलिवूड