Join us

Throwback : 5 हजार वर्षांपूर्वी कसा दिसायचा आर. माधवन? खुद्द अभिनेत्याने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 15:52 IST

सध्या एका अभिनेत्याचा असाच एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या अभिनेत्याचे नाव आहे आर. माधवन. 

ठळक मुद्दे‘रहेना हैं तेरे दिल में ’ या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

सोशल मीडियावर सेलिबे्रटी सर्रास स्वत:चे फोटो व व्हिडीओ शेअर करतात. यापैकी अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल होतात. ताज्या फोटोंसोबतच सेलिब्रेटींचे थ्रोबॅक फोटो अर्थात जुने फोटो पाहायलाही चाहत्यांना आवडते. सध्या एका अभिनेत्याचा असाच एक थ्रोबॅक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या अभिनेत्याचे नाव आहे आर. माधवन. ‘रहना है तेरे दिल में’ या चित्रपटातून चाहत्यांच्या पसंतीत उतरलेला आर. माधवन सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय आहे. नुकताच त्याने एक थ्रोबॅक फोटो शेअर केला. सध्या त्याचा हा फोटोच नाही तर या फोटोला त्याने दिलेले कॅप्शनही चर्चेत आहे. ‘5 हजार वर्षांपूर्वी...,’ असे कॅप्शन माधवनने या फोटोला दिले आहे. आहे ना मजेशीर.

 माधवनने स्वबळावर आपली ओळख निर्माण केली. अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवण्याआधी माधवन व्यक्तीमत्त्व विकास अर्थात पर्सनालिटी डेव्हल्पमेंटचे क्लासेस घ्यायचा. ‘रहेना हैं तेरे दिल में ’ या सिनेमातून त्याने बॉलिवूडमध्ये एंट्री केली.

पहिल्याच सिनेमातील आपल्या अभिनयाने माधवनने रसिकांची मने जिंकली. याशिवाय थ्री इडियट्स, रंग दे बसंती, दिल विल प्यार व्यार, तनु वेड्स मनु, तनु वेड्स मनु रिटर्नस, गुरु अशा विविध सिनेमात लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. शांती शांती शांती, एन्नावले, कन्नाथिल मुथामित्तल अशा कितीतरी दाक्षिणात्य सिनेमातही माधवनने भूमिका साकारल्या आहेत.  

टॅग्स :आर.माधवन