Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर. के. स्टुडिओला आग; अग्निशामक दलाचे सात बंब घटनास्थळी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2017 16:15 IST

मुंबई, चेंबूरमध्ये असलेल्या आर. के. स्टुडिओला भीषण आग लागली असून, आगीने रौद्ररूप धारण केले आहे. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी ...

मुंबई, चेंबूरमध्ये असलेल्या आर. के. स्टुडिओला भीषण आग लागली असून, आगीने रौद्ररूप धारण केले आहे. दरम्यान, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाचे सात बंब घटनास्थळी रवाना झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अथक प्रयत्न केले जात आहेत. आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दरम्यान, आगीत एक हॉल पूर्णपणे जळून खाक झाला आहे. दरम्यान, दुपारी दोन वाजून २२ मिनिटांच्या सुमारास अग्निशामक दलाला आर. के. स्टुडिओमध्ये आग लागल्याची माहिती मिळाली. त्यानंतरच लगेचच २.३७ मिनिटांनी अग्निशामक दलाचे एकापाठोपाठ सात बंब घटनास्थळी दाखल झाले. सध्या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, आगीमुळे घाटकोपर-ठाण्याकडे जाणाºया रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी या परिसरातील वाहतूक बंद केल्याची माहिती समोर येत आहे. आर. के. स्टुडिओ चेंबूर येथे असून, याची स्थापना दिवंगत अभिनेते राज कपूर यांनी केली आहे. सध्या या स्टुडिओचे कामकाज अभिनेते ऋषी कपूर बघत आहेत. या स्टुडिओला एक इतिहास असून, आजही बºयाचशा चित्रपटांची शूटिंग स्टुडिओमध्ये केली जाते. आगीचे कारण जरी अद्याप स्पष्ट होऊ शकले नसले तरी, आर. के. स्टुडिओला आग लागल्याची बातमी संपूर्ण इंडस्ट्रीत पसरली आहे. अग्निशमन दलाचे कर्मचारी आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम करीत असले तरी, अद्यापपर्यंत आगामी लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.