Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर. के. स्टुडिओमध्ये जपून ठेवलेल्या ‘या’ कॉस्च्युमची झाली राख!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 20:12 IST

आर. के. स्टुडिओ चेंबूरमधील आर.के. स्टुडिओला शनिवारी लागलेल्या भीषण आगीत कुठलीही जीविताहानी झालेली नाही. पण आर. के. स्टुडिओतील अनमोल ठेवा या आगीत नष्ट झाला आहे. आर. के. स्टुडिओमध्ये शूटींग झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे कॉस्च्युम या स्टुडिओत संग्रहित ठेवले जात. पण गेल्या अनेक वर्षांची ही मेहनत आगीत राख झाली आहे. चित्रपटांच्या आठवणींचा हा ठेवा जळून खाक झाला आहे. आर. के.च्या या संग्रहालयात कुठले कॉस्च्युम होते, त्यावर एक नजर...

आर. के. स्टुडिओ चेंबूरमधील आर.के. स्टुडिओला शनिवारी लागलेल्या भीषण आगीत कुठलीही जीविताहानी झालेली नाही. पण आर. के. स्टुडिओतील अनमोल ठेवा या आगीत नष्ट झाला आहे. आर. के. स्टुडिओमध्ये शूटींग झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे कॉस्च्युम या स्टुडिओत संग्रहित ठेवले जात. पण गेल्या अनेक वर्षांची ही मेहनत आगीत राख झाली आहे. चित्रपटांच्या आठवणींचा हा ठेवा जळून खाक झाला आहे. आर. के.च्या या संग्रहालयात कुठले कॉस्च्युम होते, त्यावर एक नजर...१९५१ मध्ये मधला ‘आवारा’, १९५३ मध्ये आलेला ‘आह’,१९५५ मधला ‘श्री 420’, त्यानंतर आलेले ‘जागते रहो’, ‘जिस देश मे गंगा बहती है’,‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्रेम रोग’, ‘राम तेरी गंगा मैली’, ‘हिना’, ‘प्रेम ग्रंथ’ अशा एकापेक्षा एक सरस चित्रपटांची निर्मिती आर. के. स्टुडिओमध्ये झाली आहे. या सर्व चित्रपटांचे कॉस्च्युम आर. के. स्टुडिओमध्ये संग्रहित ठेवले गेले होते.‘मेरा नाम जोकर’मध्ये राज कपूर यांच्याजवळ दिसलेला ‘जोकर’ अर्थात पपेट याठिकाणी संग्रहित ठेवला गेला होता. ऋषी कपूर यांच्यामते, ही कधीही भरून न निघणारी क्षति आहे. आर. के.स्टुडिओला आग हा माझ्यासाठी धक्का आहे. मला अजूनही विश्वास बसत नाही. आर. के. स्टुडिओमध्ये शूटींग झालेल्या प्रत्येक चित्रपटाचे कॉस्च्युम येथे जपून ठेवले होते.. पण सगळ्यांची राख झाली आहे, असे ते म्हणाले.नरगिसपासून तर ऐश्वर्या राय बच्चनने त्यांच्या चित्रपटांत घातलेले पोशाख आर.के.मध्ये संग्रहीत करण्यात आले होते. पण ते सगळे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ‘आवारा’ आणि ‘श्री420’मधील नरगिसचे कॉस्च्युम याठिकाणी होते.‘बॉबी’ या चित्रपटातील नितू सिंहने घातलेला हा आॅल टाईम फेवरेट ड्रेस आर.के. मध्ये होता.‘जिस देश में गंगा बहती है’ या चित्रपटात पद्मिनीने घातलेले ज्वेलरी याठिकाणी संग्रहीत करण्यात आली होती. पण ती सुद्धा जळून खाक झाली आहे.‘राम तेरी गंगा मैली’मध्ये अभिनेत्री मंदाकिनी हिने नेसलेली साडीही याठिकाणी जपून ठेवली गेली होती. राज कपूर यांच्या निधनानंतर आर. के. स्टुडिओची सूत्रे रणधीर कपूर यांच्या हातात आली. सध्या ऋषी कपूर आर. के. स्टुडिओचा कारभार सांभाळतात.