Join us

‘चंदामामा दूर’मध्ये आर. माधवन; सुशांतसिंह राजपूतने केले वेलकम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2017 17:32 IST

थ्री इडियट्स या सुपरहिट सिनेमात झळकलेला आर. माधवन आता संजय पूरन सिंह यांच्या ‘चंदामामा दूर’ या सिनेमामध्येही दिसणार असल्याचे ...

थ्री इडियट्स या सुपरहिट सिनेमात झळकलेला आर. माधवन आता संजय पूरन सिंह यांच्या ‘चंदामामा दूर’ या सिनेमामध्येही दिसणार असल्याचे जवळपास निश्चित समजले जात आहे. ही बातमी सिनेमातील मुख्य अभिनेता सुशांतसिंह राजपूत याला समजताच त्याने अतिशय जल्लोषात त्याचे स्वागत केले आहे.  गेल्या काही दिवसांपासून ‘चंदामामा दूर’ या सिनेमातील स्टारकास्टबाबत उत्सुकता होती. सुशांतसिंह राजपूत आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या भूमिका निश्चित झाल्यानंतर आणखी कोण अभिनेता असेल याविषयी तर्कवितर्क लावले जात होते. अखेर आर. माधवन याचे नाव निश्चित झाले आहे. मात्र सिनेमात त्याची काय भूमिका असेल हे मात्र अद्यापपर्यंत समजले नाही. दरम्यान आर. माधवनच्या सिनेमातील सहभागाबाबत सुशांत प्रचंड खूश असून, त्याने लागलीच गेल्या मंगळवारी त्याच्यासोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करीत टीममध्ये त्याचे स्वागत असल्याचे म्हटले आहे. त्याने पोस्टमध्ये लिहिले की, ‘ग्रेट न्यूज मित्रानो, सुपर टॅलेंटिड माधवान याचा ‘चंदामामा दूर’ या सिनेमातील सहभाग निश्चित समजला जात आहे. आता माधवन आणि नवाज भाईसोबतची ही जर्नी मजेदार होईल, यात शंका नाही. या सिनेमात सुशांत अंतरिक्ष यात्रीची भूमिका साकारणार आहे. नुकतेच सुशांतने सिनेमाच्या तयारीसाठी बोइंग ७३७ विमान उडविण्याची ट्रेनिंग घेतली होती. ट्रेनिंगचा त्याने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता. आर. माधवन याने गेल्या वर्षी ‘साला खडूस’ या सिनेमात काम केले होते. त्यानंतर त्याने एकाही बॉलिवूडपटात काम केले नाही. या सिनेमाची शूटिंग एप्रिल महिन्यात सुरू केले जाणार आहे. सिनेमातील संपूर्ण टीम निश्चित झाली असली तरी आर. माधवनच्या पात्राबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. cnxoldfiles/" target="_blank">Big big thanks @rohiniyer for one of the best nights ever.:) Love you a lot.❤️❤️ Happy birthday Me.