Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्यार किया तो डरना क्यामधील ही अभिनेत्री आहे एका प्रसिद्ध अभिनेत्याची पत्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 06:00 IST

या अभिनेत्याने जब वी मेट या प्रसिद्ध चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली आहे.

ठळक मुद्देअंजली जवेरीला विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये लाँच केले होते.

बॉलिवूडमध्ये आजवर अनेक कलाकार आपल्याला पाहायला मिळाले आहेत. या बॉलिवूडच्या गर्दीत काही कलाकार असे गायब होतात की, प्रेक्षकांना देखील त्यांचा विसर पडतो. अशीच एक कलाकार म्हणजे अंजली जवेरी...

अंजली जवेरीला विनोद खन्ना यांनी बॉलिवूडमध्ये लाँच केले होते. विनोद यांचा मुलगा अक्षयला बॉलिवूडमध्ये लाँच करण्यासाठी ते हिमालय पुत्र हा चित्रपट बनवत होते. अक्षय सोबत या चित्रपटात एखादी नवीन नायिका असावी अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे ते एका फ्रेश चेहऱ्याच्या शोधात होते. त्याचवेळी अंजली जवेरी ही मुलगी त्यांना दिसली आणि त्यांनी अक्षयची नायिका म्हणून तिची निवड केली. 

हिमालय पुत्र या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळाले नाही आणि त्यामुळे अक्षयला पुढील काही चित्रपटात साहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारावी लागली. पण बॉर्डर या चित्रपटानंतर त्याच्या करियरला चांगलेच वळण मिळाले तर दुसरीकडे अंजली प्यार किया तो डरना क्या या चित्रपटात अरबाज खानच्या प्रेयसीच्या भूमिकेत झळकली. अंजलीची या चित्रपटातील भूमिका महत्त्वाची असली तरी तिला लोकप्रियता मिळाली नाही. त्यामुळे ती बॉलिवूडपासून दूर गेली. ती आता बॉलिवूडमध्ये काम करत नसली तरी दाक्षिणात्य चित्रपटात ती काम करताना दिसते. तिने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली ओळख देखील निर्माण केली आहे. 

अंजली प्रसिद्ध मॉडेल आणि अभिनेता तरुण अरोराची पत्नी आहे. तरुणने जब वी मेट या चित्रपटात अंशुमनची भूमिका साकारली होती. 

टॅग्स :बॉलिवूड