Join us

"तो डिस्टर्ब..." हिट अँड रन केसवेळी सलमानची झालेली अशी अवस्था; पुनीत इस्सर यांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 17:11 IST

सलीम खान यांनी तेव्हा काय केलं?, पुनीत इस्सर म्हणाले....

अभिनेता सलमान खान (Salman Khan) काही वर्षांपूर्वी हिट अंड रन केसमध्ये अडकला होता. तो निर्दोष असल्याचा निर्णयही नंतर कोर्टात झाला होता. मात्र त्या केसचा संपूर्ण काळ सलमान खानची कशी अवस्था होती याचा खुलासा नुकतंच अभिनेते पुनीत इस्सर (Puneet Issar) यांनी केला आहे. पुनीत इस्सर यांनी सलमान सोबत सिनेमांमध्ये काम केलं आहे. तसंच ते बिग बॉसमध्येही दिसले होते. नुकतंच एका मुलाखतीत त्यांनी सलमानच्या त्या कठीण काळावर भाष्य केलं.

सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत पुनीत इस्सर म्हणाले, "सलमान तेव्हा कायदेशीर कचाट्यात सापडला होता. माध्यमांमध्येही त्याच्याबाबतीत बऱ्याच चर्चा होत होत्या.  त्याने याचा परिणाम कामावर होऊ दिला नाही. पण तो खूप डिस्टर्ब असायचा. त्याच्या कुटुंबियांनी त्याला कामात लक्ष घाल असा सल्ला दिला होता. 'काम करते रहो' असं सलीम खान म्हणाले होते. मलाही त्यांनी सलमानची समजूत काढायला सांगितलं होतं."

याच मुलाखतीत पुनीत इस्सर म्हणाले की सलमानने त्यांना जबरदस्ती बिग बॉसमध्ये जायला लावलं होतं. 'मी तुला लवकर शोमधून बाहेर काढेन' असं तो त्यांना म्हणाला होता. 

सलमान खान आणि पुनीत इस्सर यांनी 'गर्व','पार्टनर' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. सलमान नुकताच 'सिकंदर' सिनेमात दिसला. आता तो आगामी सिनेमाच्या तयारीला लागला आहे. गलवान खोऱ्यात भारत विरुद्ध चीनमध्ये झालेल्या संघर्षावर आधारित सिनेमात तो आर्मी अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.

टॅग्स :सलमान खानपुनीत इस्सारबॉलिवूड