अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’बद्दल एक ताजी बातमी आहे. होय, खुद्द अजयने ही बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे. येत्या २२ फेबु्रवारीला हा चित्रपट प्र्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. सध्या ‘टोटल धमाल’ची अख्खी टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. याचदरम्यान अजय देवगणने एक ट्वीट करत, ‘टोटल धमाल’ पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नसल्याची माहिती दिली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर अजय देवगणने ‘टोटल धमाल’बद्दल घेतला हा मोठा निर्णय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2019 13:59 IST
अजय देवगणचा आगामी चित्रपट ‘टोटल धमाल’बद्दल एक ताजी बातमी आहे. होय, खुद्द अजयने ही बातमी चाहत्यांशी शेअर केली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर अजय देवगणने ‘टोटल धमाल’बद्दल घेतला हा मोठा निर्णय!
ठळक मुद्दे‘टोटल धमाल’ हा अजयच्या ‘धमाल’ फ्रेंचाइजीचा तिसरा सिनेमा आहे. या सीरिजचा पहिला भाग २००७ मध्ये प्रदर्शित झाला होता. यानंतर २०११ मध्ये ‘डबल धमाल’ या सीक्वलने बॉक्स आॅफिसवर धूम केली होती.