Join us

​हा घ्या पुरावा! प्रियांका चोप्राचा बॉलिवूड सिनेमा पक्का!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2017 14:42 IST

एरवी गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रियांका चोप्रा भारतात कमी अन् अमेरिकेत जास्त असते. पण सध्या ती आपल्या कुटुंबासोबत आहे. गणेशोत्सव ...

एरवी गेल्या दोन-तीन वर्षांपासून प्रियांका चोप्रा भारतात कमी अन् अमेरिकेत जास्त असते. पण सध्या ती आपल्या कुटुंबासोबत आहे. गणेशोत्सव आपल्या कुटुंबासोबत साजरा करण्याचा निर्णय प्रियांकाने घेतला आहे. त्यामुळे तूर्तास प्रियांका भारतात आहे. अर्थात असे असले तरी प्रियांकाने काम सोडलेले नाहीच. भारतात सुट्टी घालवण्यासोबतच आपल्या कामावर तिचे पूर्ण लक्ष आहे. आपल्या अपकमिंग प्रोजेक्टवर तिने लक्ष केंद्रीत केले आहे. विश्वास बसत नसेल तर प्रियांकाने सोशल मीडियावर शेअर केलेला हा फोटो तुम्हाला बघायलाच हवा. या फोटोत एका टेबलवर काही स्क्रिप्ट ठेवलेल्या दिसत आहेत. प्रियांकाने इन्स्टा स्टोरीवर हा फोटो शेअर करत, ‘सॅटरडे वाइव्स’ असे कॅप्शन दिले आहे.हा फोटो पाहून प्रियांका तिच्या आगामी चित्रपटाच्या स्क्रिप्ट वाचण्यात गुंग असल्याचे दिसतेयं. संजय लीला भन्साळींच्या चित्रपटात प्रियांका दिसणार असल्याची चर्चा सध्या जोरात आहे. कदाचित या चित्रपटाला पूर्ण वेळ देण्याचा निर्णय पीसीने घेतला आहे. इतका की,  प्रियांकाने स्वत:चा वीकेंन्डही या कामात घातला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भन्साळींच्या ‘गुस्ताखियां’ या चित्रपटाचा हिरो या महिन्यात फायनल केला जाणार आहे. भन्साळी सध्या ‘पद्मावती’त बिझी आहे. त्यामुळे प्रियांकाचा हा चित्रपट पुढील वर्षीच सुरु होईल, अशी चिन्हे आहेत. सध्या प्रियांकाच्या अपोझिट अनेकांची नावे चर्चेत आहे. या यादीत शाहरूख खानपासून तर इरफान खान ते अभिषेक बच्चनपर्यंतची नावे या चित्रपटासाठी चर्चेत आहेत. त्यामुळे या चित्रपटात प्रियांकाच्या अपोझिट कुणाची वर्णी लागते, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता तुम्हाला या चित्रपटात तुम्हाला कोणत्या हिरोला पाहायला आवडेल, हे आम्हाला सांगायला विसरू नका.