‘हॅपी’साठी मीकाने गायले प्रमोशनल सॉन्ग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2016 17:17 IST
डायना पेंटी, अभय देओल, अली फजल आणि जिम्मी शेरगिल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘हॅपी भाग जाएगी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस ...
‘हॅपी’साठी मीकाने गायले प्रमोशनल सॉन्ग!
डायना पेंटी, अभय देओल, अली फजल आणि जिम्मी शेरगिल यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘हॅपी भाग जाएगी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिंगींग सेंसेशन मीका सिंह याने या चित्रपटात प्रमोशनल सॉन्ग गायले आहे. या गाण्यात डायना, अभय, अली फजल व जिम्मी शेरगिल असे सगळेच दिसणार आहे. ‘गबरू रेडी टू मिंगल है..’ असे या गाण्याचे शब्द आहेत. मुद्दस्सर अली दिग्दर्शित ‘हॅपी भाग जाएगी’मध्ये डायनाने हरप्रित कौर म्हणजेच हॅपीची भूमिका साकारली आहे. दिग्दर्शकाच्या मते, हॅपी हिच या गाण्यातील आत्मा आहे. हॅपी ही सर्वांना पे्ररणा देणारी मनमौजी अशी व्यक्तिरेखा आहे.