पिंक सिटीत ‘ढिशूम’ चे प्रमोशन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2016 10:23 IST
सध्या ‘ढिशूम’ चित्रपटाची प्रचंड चर्चा ‘बी’ टाऊनमध्ये सुरू आहे. चित्रपटाची टीम नुकतीच ‘जयपूर’ या पिंक सिटीत प्रमोशनसाठी गेली होती. ...
पिंक सिटीत ‘ढिशूम’ चे प्रमोशन!
सध्या ‘ढिशूम’ चित्रपटाची प्रचंड चर्चा ‘बी’ टाऊनमध्ये सुरू आहे. चित्रपटाची टीम नुकतीच ‘जयपूर’ या पिंक सिटीत प्रमोशनसाठी गेली होती. पत्रिका गेट या ठिकाणी वरूण धवन आणि जॅकलीन फर्नांडिस यांनी चक्क एटीव्ही बाईकवरून एन्ट्री घेतली.तिथे युवक, युवती आणि सामान्य नागरिक यांची गर्दी जमलेलीच होती. मग काय? तिथे ‘सौ तरह के..’ या गाण्यावर डान्स केला. वरूण-जॅकलीन यांनी तिथे चाहत्यांशी संवाद साधला.‘ढिशूम’ चित्रपटाच्या टीमसोबत काम करण्याचा अनुभव आणि गमतीजमती त्यांनी चाहत्यांसोबत शेअर केल्या. रोहित धवन दिग्दर्शित चित्रपट २९ जुलैला रिलीज होणार आहे.