व्यावसायिक रणबीर-कटरिना जग्गा जासूससाठी एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2016 15:33 IST
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कटरिना कैफ हे दोघे जग्गा जासूसच्या प्रमोशनसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे.यापूर्वी अशा ...
व्यावसायिक रणबीर-कटरिना जग्गा जासूससाठी एकत्र
बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री कटरिना कैफ हे दोघे जग्गा जासूसच्या प्रमोशनसाठी एकत्र येण्याची शक्यता आहे.यापूर्वी अशा अफवा होत्या की, रणबीर आणि कटरिना यांच्यातील संबंध तुटल्यानंतर हे दोघे कधीही एकत्र येणार नाहीत किंवा एकत्र चित्रपट करणार नाहीत.चित्रपटाचे निर्माता आणि डिस्री इंडियाचे सीईओ सिद्धार्थ रॉय कपूर यांच्या अनुसार ‘ते दोघेही व्यावसायिक आहेत आणि जग्गा जासूसच्या प्रमोशनासाठी काहीही करण्यास तयार होतील.’या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनुराग बासू यांच्यावर अवलंबून असून, ती लवकरच जाहीर केली जाणार आहे.जग्गा जासूसचे शुटींग आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर २०१४ साली सुरू झाले होते. परंतू याच्या प्रमुख अभिनेत्यांच्या व्यस्ततेमुळे सुरुवातीला उशीर झाला. ‘या चित्रपटाच्या अंतिम टप्प्यात आम्ही असून, येत्या काही दिवसात ते पूर्ण होईल आणि त्याच्या प्रदर्शनाची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल’, असे सिद्धार्थ यांनी सांगितले.