Join us

निर्माती प्रेरणा अरोराला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 19:25 IST

हिंदी चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा हिला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.

हिंदी चित्रपट निर्माती प्रेरणा अरोरा हिला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. क्रिअर्ज एण्टरटेन्मेंट ही प्रेरणाची निर्मिती संस्था असून या बॅनरअंतर्गत तिने काही हिंदी चित्रपटांची निर्मिती केली आहे. १६ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. याआधीही प्रेरणावर आर्थिक फसवणुकीचे बरेच आरोप करण्यात आले होते.

‘टॉयलेट : एक प्रेम कथा’, ‘परी’, ‘फन्ने खान’ यांसारख्या चित्रपटांची निर्मिती प्रेरणा अरोराने केली आहे. पद्मा फिल्म्सच्या अनिल गुप्ता यांनी प्रेरणा विरोधात आर्थिक फसवणुकीचा आरोप केला आहे. याप्रकरणी क्रिअर्ज एंटरटेन्मेंटविरोधात सप्टेंबर महिन्यात एफआरआयसुद्धा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी प्रेरणाने सर्व आरोप फेटाळून लावले होते.केदारनाथ या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा प्रेरणा सांभाळत होती. परंतु दिग्दर्शक अभिषेक कपूरनेही तिच्यावर पैसे थकविल्याचा आरोप केला होता. या वादामुळे प्रेरणाने केदारनाथच्या निर्मितीतून काढता पाय घेतला. इतकेच नव्हे तर जॉन अब्राहमच्या जेए एंटरटेन्मेंटनेही क्रिअर्जविरोधात कायदेशीर नोटीस बजावली आहे.