Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंकाचे सेल्फीप्रेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 09:30 IST

वर्षातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा म्हणजे आॅस्कर. यावर्षी भारताकडून कोणालाच नामांकन नाही. परंतु तरीदेखील सर्वांना यंदाच्या आॅस्करचे वेध लागले ...

वर्षातील सर्वात मोठा पुरस्कार सोहळा म्हणजे आॅस्कर. यावर्षी भारताकडून कोणालाच नामांकन नाही. परंतु तरीदेखील सर्वांना यंदाच्या आॅस्करचे वेध लागले आहेत. त्याचे कारण आहे आपली पिग्गी चॉप्स!बॉलिवूडनंतर आता हॉलिवूडलाही आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने भुरळ घातलेली प्रियंका चोपडा आॅस्कर पुरस्कार प्रदान करणार आहे. त्यामुळे हॉलिवूड स्टारसोबत ‘देसी गर्ल’ला पाहण्यासाठी सर्वच जण उत्सुक आहे.आॅस्करच्या पूर्वसंध्येला झालेल्या पार्टीमध्येसुद्धा ती सहभागी झाली होती. तेथे केलेली धमाल तिने फॅन्ससाठी शेअर केली आहे. तेथील मित्र आणि सहकलाकारांसोबत पीसी सेल्फी काढण्यात पूर्ण दंग होती. तिने पोस्ट केलेल्या या फोटोंमधून तिचे सेल्फी प्रेम स्पष्ट दिसतेय.