Join us
Daily Top 2Weekly Top 5

​प्रियांकाचा नवा विक्रम !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2016 13:37 IST

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत यशस्वीतेची गरुड झेप घेणाऱ्या प्रियांका चोप्राने सर्व भारतीय अभिनेत्रींना मागे टाकत एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर ...

बॉलिवूड ते हॉलिवूडपर्यंत यशस्वीतेची गरुड झेप घेणाऱ्या प्रियांका चोप्राने सर्व भारतीय अभिनेत्रींना मागे टाकत एक नवा विक्रम स्वत:च्या नावावर केला आहे. जगातील सर्वात जास्त फीस घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत प्रियांकाने मजल मारली असून या यादीत विक्रमी 73 कोटी रुपयांच्या फीससह आठवं स्थान मिळालं आहे. हा विक्रम नोंदवणारी  प्रियांका पहिलीच भारतीय अभिनेत्री आहे.नुकतीच फोर्ब्सकडून जगात सर्वात जास्त फीस घेणाऱ्या हायपेड अभिनेत्रींची यादी जाहीर करण्यात आली. हॉलिवूड अभिनेत्री 288 कोटी रुपये एवढ्या फीससह पहिल्या स्थानावर आहे.यादीतील टॉप 10 अभिनेत्री1) सोफिया वजार्रा 288 कोटी2) कॅली कुओको 164 कोटी3) मिंडी कॅलिंग 100 कोटी4) मॅरिस्का हार्टिगे 97 कोटी5) अ‍ॅलेन पॉम्पियो 97 कोटी6) कॅरी वॉशिंग्टन 90 कोटी7) स्टॅना कॅटिक 80 कोटी8) प्रियांका चोप्रा 73 कोटी9) जुलियाना मारगुलिस 70 कोटी10) ज्यूली बॉवेन 67 कोटी