Join us

​प्रियंकाच्या भावावर पुणे पोलिसात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2016 18:30 IST

पुण्यातील कोरेगाव पार्कात अभिनेत्री प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचे हॉटेल असून तिथे अनधिकृतपणे स्मोकिंग झोन आणि त्याबाहेर हुक्कादेखील उपलब्ध ...

पुण्यातील कोरेगाव पार्कात अभिनेत्री प्रियंका चोप्राचा भाऊ सिद्धार्थ चोप्राचे हॉटेल असून तिथे अनधिकृतपणे स्मोकिंग झोन आणि त्याबाहेर हुक्कादेखील उपलब्ध होत असल्याचे पोलिसांच्या धाडीत समोर आले आहे. टाकलेल्या धाडीत पोलिसांनी १८ हुक्का मशीन जप्त केल्या असून १६ ग्राहकांना नोटिसाही बजावल्या आहेत. आतापर्यंत सिद्धार्थ चोप्राच्या या हॉटेलवर कारवाई करण्याची ही दुसरी वेळ आहे.दरम्यान, पुण्याच्या गुन्हे शाखेनं ही करावाई केली असून या सगळ्या प्रकारावर सिद्धार्थ चोप्राची कुठलीही प्रतिक्रिया अद्याप समजलेली नाही. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.