प्रियांका डिसेंबरमध्ये देणार ‘मोठी बातमी’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2016 21:55 IST
प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा ‘क्वांटिको’मुळे चर्चेत आहे. या अमेरिकन शोचे दुसरे सीझन लवकरच प्रसारित होत आहे. यामुळे सध्या पीसी ...
प्रियांका डिसेंबरमध्ये देणार ‘मोठी बातमी’!
प्रियांका चोप्रा पुन्हा एकदा ‘क्वांटिको’मुळे चर्चेत आहे. या अमेरिकन शोचे दुसरे सीझन लवकरच प्रसारित होत आहे. यामुळे सध्या पीसी प्रचंड उत्साहित आहे. ‘क्वांटिको’च्या पहिल्या सीझनमधील प्रियांकाचा अभिनय चांगलाच वाखाणल्या गेला होता. आता दुसºया सीझनकडूनही लोकांनाही बºयाच अपेक्षा आहेत. एकंदर काय तर पीसीने हॉलिवूडमध्ये चांगलाच जम बसवला आहे. त्यामुळेच प्रियांका लवकरच बॉलिवूड सोडून अमेरिकेत स्थायिक होणार, अशी चर्चा सध्या ऐकायला मिळते आहे. मात्र खुद्द प्रियांकाने या बातमीत काहीही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूड सोडण्याचा प्रियांकाचा कुठलाही विचार नाही. किंबहुना प्रियांका लवकरच एक बॉलिवूड सिनेमा साईन करणार आहे. डिसेंबरमध्ये या बॉलिवूडपटाची घोषणा प्रियांका करणार आहे. ‘बाजीराव मस्तानी’नंतर प्रियांका प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’मध्ये दिसली होती. पण तेव्हापासून तिच्या हाती एकही बॉलिवूड चित्रपट नाही. आता डिसेंबरमध्ये प्रियांका कुठली घोषणा करते, ते बघूयात. अर्थात तोपर्यंत प्रतीक्षा ही आलीच!!