प्रिया प्रकाश वारियरवरून बॉलिवूडच्या दोन दिग्दर्शकांत जुंपली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2018 15:03 IST
आपल्या खट्याळ डोळ्यांनी सगळ्यांना वेड लावणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा सुरु कधीच्याच सुरू झाल्या ...
प्रिया प्रकाश वारियरवरून बॉलिवूडच्या दोन दिग्दर्शकांत जुंपली!
आपल्या खट्याळ डोळ्यांनी सगळ्यांना वेड लावणारी मल्याळम अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर हिच्या बॉलिवूड डेब्यूच्या चर्चा सुरु कधीच्याच सुरू झाल्या आहेत. आता तर प्रियाला घेण्यावरून बॉलिवूड दिग्दर्शकांत आपआपसांत चढाओढ सुरु झाली आहे. होय, चर्चा खरी मानाल तर बॉलिवूडचे दोन आघाडीचे दिग्दर्शक -निर्माते प्रिया प्रकाश वारियरला आपल्या चित्रपटात घेण्यास उत्सूक आहेत. तूर्तास प्रियाने कुठलाही बॉलिवूड प्रोजेक्ट स्वीकारलेला नाही. पण करण जोहर आणि साजिद नाडियाडवाला या दोघांनाही ती आपल्या चित्रपटात हवी आहे. याचवरून म्हणे या दोघांत चढाओढ सुरु झाली आहे. करण जोहर प्रियाला ‘स्टुडंट आॅफ द ईअर2’मध्ये घेऊ इच्छितो तर साजिद त्याच्या अन्य एका आगामी चित्रपटात प्रियाला कास्ट करू इच्छितो. आता प्रिया या दोघांपैकी कुणाची आॅफर स्वीकारते, हे तर येणारा काळचं सांगेल. पण एक गोष्ट मात्र नक्की प्रियाची लोकप्रीयता प्रत्येकाला ‘कॅश’ करायची आहे. करण आणि साजिद हे दोघेही त्यातलेच.ALSO READ : व्हायरल गर्ल प्रिया प्रकाशच्या नव्या फोटोंमुळे इंटरनेटवर सनसनी, पाहा फोटो!‘ओरू अडार लव’या चित्रपटातील ‘मानिका मलयारा पूवी’ या गाण्याच्या एका क्लिपने प्रिया प्रकाशला एका रात्रीत स्टार बनवले. ही क्लिप इतक्या वेगाने व्हायरल झाली की, एकाच दिवसांत प्रियाच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सची संख्या सहा लाखांवर पोहोचली. या फॅन फॉलोविंगने प्रियाला जगातील तिसरी पॉप्युलर इन्स्टा सिलेब्स बनवले. या व्हिडिओत प्रिया प्रकाश ‘आंखों ही आंखों में’रोमान्स करताना दिसली होती. प्रिया ही केरळच्या त्रिशूरची राहणारी आहे. डान्स आणि भटकंती हे तिचे आवडते छंद आहेत. बी कॉम फर्स्ट ईअरची विद्याथीर्नी असलेली प्रिया सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टिव्ह आहे. ‘ओरू अडार लव’या चित्रपटात प्रिया एका किशोरवयीन मुलीच्या भूमिकेत आहे. किशोरवयात मनात फुलू लागलेल्या प्रेमाची कथा यात आहे. हा प्रियाचा डेब्यू सिनेमा आहे.