प्रियंकाला खात्री, फॅन्स विसणार नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2016 17:51 IST
अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या अनुसार भारतात परतल्यानंतर तिचे फॅन्स तिला विसरतील, त्यामुळे तिचे करिअर धोक्यात आहे असे वाटत नाही.असे ...
प्रियंकाला खात्री, फॅन्स विसणार नाहीत
अभिनेत्री प्रियंका चोप्राच्या अनुसार भारतात परतल्यानंतर तिचे फॅन्स तिला विसरतील, त्यामुळे तिचे करिअर धोक्यात आहे असे वाटत नाही.असे अनेक अभिनेते, अभिनेत्री आहेत, ज्यांचे चित्रपट दोन ते तीन वर्षे येत नाहीत. भारतीय दर्शक मला पाहिले नाही तर विसरतील असे मला वाटत नाही. मी असुरक्षित समजत नसल्याचे प्रियंकाने सांगितले.गेल्या अनेक महिन्यांपासून प्रियंका भारतीय चित्रपटात काम करीत नाही. सप्टेंबर महिन्यात क्वाँटिकोचे प्रदर्शन सुरू होईल. तिचा हॉलीवूड चित्रपटात पदार्पण करणारा बेवॉच हा चित्रपट येत्या मे महिन्यात प्रदर्शित होईल. केवळ दिसण्यासाठी मी हिंदी चित्रपटात काम करीत नाही. माझा शो प्रत्येक शनिवारी येईल आणि तुम्ही मला पडद्यावर पाहू शकाल. अगदी माझा बेवॉच हा चित्रपट देखील येत आहे. भारतीय दर्शकांना मला पाहण्यासाठी या असे सांगावे लागत नाही. त्यांना जर तुमचा चित्रपट पहायचा असेल तर ते नक्कीच तुम्हाला पाहतील. तुम्ही चित्रपट पहायला या अशी कोणावरही बळजबरी करु शकत नसल्याचेही प्रियंकाने सांगितले.