Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंकाला दुसऱ्यांदा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2016 15:34 IST

अमेरिकन शो ‘क्वांटिको’ आणि हॉलीवूड चित्रपट ‘बेवॉच’ मध्ये भारताचे नाव झळकवणारी प्रियंका चोप्रा हिला नुकताच ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर ...

अमेरिकन शो ‘क्वांटिको’ आणि हॉलीवूड चित्रपट ‘बेवॉच’ मध्ये भारताचे नाव झळकवणारी प्रियंका चोप्रा हिला नुकताच ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार तिला दुसºयांदा मिळणार आहे.‘सात खुन माफ’ मधील तिच्या अभिनयासाठी तिला पहिला पुरस्कार मिळाला होता. दादासाहेब फाळकेंच्या १४७ जयंतीनिमित्त देण्यात येणारा ‘बेस्ट अ‍ॅक्ट्रेस आॅफ द ईअर’ हा पुरस्कार प्रियंका चोप्राला दादासाहेब फिल्म फाऊंडेशनतर्फे मिळणार आहे.पुरस्काराचा सोहळा २४ एप्रिल रोजी मुंबईत होणार असून ती या सोहळ्याला उपस्थित राहणार की नाही ? हे अद्याप माहिती नाही. वेल, काहीही असले तरी प्रियंका तुझे अभिनंदन!