बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अखेर काल २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाह बंधनात अडकली. अमेरिकन सिंगर निक जोनासोबत तिने लग्नगाठ बांधली. १ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने तर २ डिसेंबरला प्रियांकाने हिंदू पद्धतीने लग्न केले. अगदी जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थित पार पडलेल्या या विवाहसोहळ्याने सगळ्यांच्याच डोळ्यांचे पारणे फेडले. या लग्नाचा एकही फोटो अद्याप बाहेर आलेला नाही. पण लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांनी दिलेल्या माहितीनुसार, निकच्या गळ्यात वरमाला घालताना प्रियांका कमालीची भावूक झाली होती. यावेळी तिच्या डोळ्यांत अश्रू आलेत. प्रियांकाच्या डोळ्यांत अश्रू बघून निकने तिला लगेच सांभाळले आणि ‘देसी गर्ल’च्या ओठांवर पुन्हा हसू उमलले.
Priyanka Nick Wedding : भर मंडपात प्रियांका झाली भावूक, डोळ्यांत दाटले अश्रू!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 11:20 IST
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्रा अखेर काल २ डिसेंबरला हिंदू पद्धतीने विवाह बंधनात अडकली. अमेरिकन सिंगर निक जोनासोबत तिने लग्नगाठ बांधली. १ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने तर २ डिसेंबरला प्रियांकाने हिंदू पद्धतीने लग्न केले.
Priyanka Nick Wedding : भर मंडपात प्रियांका झाली भावूक, डोळ्यांत दाटले अश्रू!!
ठळक मुद्देप्रियांकाच्या डोळ्यांत अश्रू बघून निकने तिला लगेच सांभाळले आणि ‘देसी गर्ल’च्या ओठांवर पुन्हा हसू उमलले.