Join us

Priyanka Nick Wedding : प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या ग्रॅण्ड वेडिंगसाठी थ्रीडी रोषणाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2018 20:16 IST

बॉलिवूडची पिग्गी चॉप्स म्हणजेच प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या लग्नासाठी उमैद भवनावर थ्री-डी लाईट्सची रोषणाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्याला एखाद्या राजवाड्याचे स्वरुप आले आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा व निक जोनास यांचे लग्न काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्या दोघांचे जगभरातील चाहते त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी खूप उत्सुक आहेत. जोधपूर येथील उमैद भवन पॅलेसमध्ये प्रियांका आणि निकचा शाही विवाह सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी उमैद भवनावर रोषणाई करण्यात आली आहे. आकर्षक सजावट आणि रोषणाईने सजलेल्या उमैद भवनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. उमैद भवनावर थ्री-डी लाईट्सची रोषणाई केल्यामुळे त्याला एखाद्या राजवाड्याचे स्वरुप आले आहे.

लग्नाच्या पार्श्वभूमीवर उमैद भवन आणि प्रियांकाचं मुबंईतील घर रोषणाईमध्ये नाहून निघालं आहे. पाहाणाऱ्यांच्या डोळ्याचं पारणं फिटेल अशी जबरदस्त रोषणाई आणि सजावट या दोन्ही ठिकाणी करण्यात आली आहे. निक आणि प्रियांका दोघेही प्रचंड प्रसिद्ध असल्याने त्यांच्या लग्नाची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो एका इंटरनॅशनल पब्लिकेशनला त्यांनी १८ कोटीला विकले गेले असल्याचेही कळतेय. २९ नोव्हेंबरला प्रियांकाच्या हातांवर निकच्या नावाची मेहंदी रचेल. यानंतर ३० नोव्हेंबरला जोधपूरच्या मेहरानगड किल्लयात संगीत सेरेमनी होईल. याच दिवशी प्रियांका व निक कॉकटेल पार्टी होस्ट करतील. यात केवळ प्रियांका व निकचे जवळचे मित्र व नातेवाईक सामील होतील. १ डिसेंबरला हळदीचा कार्यक्रम होईल. २ डिसेंबरला प्रियांका व निक लग्नबंधनात अडकतील.२ डिसेंबरला हिंदू पद्धतीने तर ३ डिसेंबरला हे कपल ख्रिश्चन पद्धतीने रेशीमगाठीत अडकणार आहे. दोन्ही पद्धतीने लग्न एकाच ठिकाणी पार पडणार आहे. लग्नानंतर प्रियांका-निक दोन रिसेप्शन देतील. 

 

 

टॅग्स :प्रियांका चोप्रा आणि निक जोनासप्रियंका चोप्रानिक जोनास