अद्याप उमेद भवनातील प्रियांकाच्या लग्नाचा एकही फोटो लीक झालेला नाही. पण निकयांकाच्या वेडिंग फोटोशूटचे फोटो मात्र समोर आले आहेत. होय, हे वेडिंग फोटोशूटचे फोटो इतके हटके आणि खास आहे की, तुम्हीही त्यावरून नजर हटवू शकणार नाही.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास काल १ डिसेंबरला ख्रिश्चन पद्धतीने लग्नबंधनात अडकले. त्यापूर्वी प्रियांकांच्या मेहंदी सेरेमनीचे आयोजन झाले. आज २ डिसेंबरला हे कपल हिंदू पद्धतीने विवाहबद्ध होणार आहे.
जोधपूरच्या उमेद भवन या रॉयल पॅलेसमध्ये हे शाही लग्न होणार आहे. हिंदू पद्धतीच्या विवाहात निक अगदी राजसी थाटात बग्घीवरून एन्ट्री घेणार आहे. हिंदू पद्धतीनुसार होणाऱ्या लग्नात प्रियांका चोप्रा अबू जानी आणि संदीप खोसला किंवा सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलेल्या लाल रंगाच्या आऊटफिटमध्ये दिसणार आहे.
या फोटोंमध्ये दोघांचीही केमिस्ट्री बघण्यासारखी आहे. हे फोटो पाहून प्रियांकाचे चाहते पुन्हा एकदा प्रियांकाच्या प्रेमात पडणार हे नक्की.