Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवूडमध्ये 'हीने' केली होती धमाकेदार एन्ट्री, आता इतक्या वर्षांनी ओळखणंही झालं कठिण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2020 13:58 IST

'जेम्स' आणि 'द किलर' सारख्या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी प्रियांका आज रूपेरी पडद्यावरून पूर्णपणे गायब झाली आहे.

बॉलिवूडमध्ये दररोज स्टारचं नशीब चमकत असतं. कधी काही लोक रातोरात स्टार बनतात तर काही लोक सिनेमा फ्लॉप होताच इंडस्ट्रीतून बाहेर होतात. २००५ मध्ये 'सरकार' सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करणाऱ्या प्रियांका कोठारीच्या नशीबाने अशी पलटी मारली की, काही काळाने लोकांनी तिच्याबाबत विचारणेही बंद केले. 'जेम्स' आणि 'द किलर' सारख्या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी प्रियांका आज रूपेरी पडद्यावरून पूर्णपणे गायब झाली आहे.

प्रियांका कोठारीचं खरं नाव निशा कोठारी आहे. ३० नोव्हेंबर १९८३ ला तिचा जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला होता. 'चढती जवानी मेरी चाल मस्तानी' च्या रीमिक्स गाण्यामुळे प्रियांकाला ओळख मिळाली होती. आर. माधवनमुळे तिला २००३ मध्ये तमिळ सिनेमा जय जय मध्ये ब्रेक मिळाला.

हिंदी सिनेमात तिला पहिला ब्रेक राम गोपाल वर्माने दिला होता. ती 'शिवा', 'डरना जरूरी है', 'गो', 'डार्लिंग', 'आग', 'अज्ञात', 'बिन बुलाए बाराती' सारख्या सिनेमात दिसली होती. त्यासोबत ती अनेक तेलगु आणि तमिळ सिनेमांमध्येही दिसली होती. पण तिला काही खास ओळख मिळू शकली नाही.

२०१६ मध्ये प्रियांकाने दिल्लीच्या एक बिझनेसमनसोबत लग्न केलं. लग्नानंतर तिने तिचं नाव बदलून अंजली वर्मा केलं. काही दिवसांपूर्वीच ती दिल्लीत सेलिब्रिटी सॉकर मॅचमध्ये दिसली होती. तेव्हा तिला पाहून लोकांचा विश्वास बसला नाही. कधीकाळी स्लिम दिसणाऱ्या दिशाचं खूप वजन वाढलं होतं.

प्रियांका अखेरची २०१६ मध्ये आलेल्या बुलेट राजा सिनेमात दिसली होती. हा सिनेमा कन्नड आणि तेलुगू भाषेत रिलीज झाला होता. आता ती सिनेमापासून दूर आहे. आता ती केवळ मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये दिसते.  

टॅग्स :बॉलिवूडसोशल व्हायरल