Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियांकाला मिळाला नवा हॉलिवूड शो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2016 18:19 IST

प्रियांका चोप्राच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. होय, ‘क्वांटिको’ या हॉलिवूड शोनंतर प्रियांकाच्या हाती आणखी एक हॉलिवूड शो लागला आहे. या शोचे नाव आहे, ‘प्रोजेक्ट रनवे’.

प्रियांका चोप्राच्या चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. होय, ‘क्वांटिको’ या हॉलिवूड शोनंतर प्रियांकाच्या हाती आणखी एक हॉलिवूड शो लागला आहे. या शोचे नाव आहे, ‘प्रोजेक्ट रनवे’. ‘क्वांटिको’मध्ये प्रियांकाएलेक्स पेरिस नामक एफबीआय एजंटच्या भूमिकेत दिसली होती. या नव्या शोमध्ये ती सेलिब्रिटी गेस्टच्या रूपात दिसणार आहे. ‘प्रोजेक्ट रनवे’ हा एक लोकप्रिय फॅशन रिअ‍ॅलिटी शो आहे. याच्या १५ व्या सीझनमध्ये प्रियांका दिसणार आहे. या शोबद्दल माहिती देत प्रियांकाने मॉडल-प्रोड्यूसर हेदी क्लूम व अन्य काहींसोबतचा एक क्यूट फोटो इस्टाग्रामवर शेअर केला आहे. तेव्हा वेट अ‍ॅण्ड वॉच!!