Join us
Daily Top 2Weekly Top 5

​पुढील वर्षी जगापुढे येणार प्रियांका चोप्राच्या ‘अनफिनिश्ड’ गोष्टी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2018 18:23 IST

ट्विंकल खन्ना, ऋषी कपूर, आयुष्यमान खुराणा, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या यादीत आता प्रियांका चोप्रा हिचे नावही सामील झाले आहे. होय, ...

ट्विंकल खन्ना, ऋषी कपूर, आयुष्यमान खुराणा, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या यादीत आता प्रियांका चोप्रा हिचे नावही सामील झाले आहे. होय, प्रियांका आता अभिनयासोबतचं साहित्याच्या दुनियेतही पाऊल ठेवतेय. प्रियांकाने तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासादरम्यानच्या अनेक आठवणी, अनुभव शब्दबद्ध केल्या आहेत आणि त्या  पुस्तकरूपात आपल्याला लवकरचं वाचायला मिळणार आहेत. ‘अनफिनिश्ड’ असे तिच्या या पुस्तकाचे नाव असेल. यात प्रियांकाच्या आठवणी, तिच्या आयुष्यातील काही घटना आणि ब-या वाईट अनुभवांचा संग्रह  यात असेल.पुढील वर्षी प्रियांकाचे हे पुस्तक बाजारात उपलब्ध असेल. आजपर्यंत प्रियांका ज्या विषयांवर कधीच बोलली नाही, त्या विषयांवर ती यात लिहिणार आहे. पेंग्विन रँडम हाऊस इंडिया या पुस्तकाचे प्रकाशक असतील. अलीकडे पेंग्विनने या पुस्तकाची घोषणा केली. पेंग्विनच्या मते, प्रियांकाच्या या पुस्तकातील शब्द मुलींना स्वप्न पाहण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी प्रेरणादायक ठरतील.केवळ भारतातचं नाही तर अमेरिका आणि ब्रिटनमध्येही हे पुस्तक प्रकाशित होईल. निश्चितपणे प्रियांकाच्या या पुस्तकाची घोषणा होताच, चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. चाहत्यांइतकीच प्रियांकाही या पुस्काबद्दल उत्सूक आहे. या पुस्तकाचा अंदाज माझ्यासारखाच, मजेशीर, खुसखुशीत, बोल्ड आणि बंडखोर असेल. मी कायम आपला खासगीपणा जपला आहे. मी माझ्या अख्ख्या प्रवासात माझ्या भावना दडवून ठेवल्या. त्याबद्दल बोलणे टाळले. पण आता मी माझ्या भावना जगापुढे व्यक्त करण्यास तयार आहे, असे ती म्हणाली.  ALSO READ : ​फॅमिली वेडिंगदरम्यान एकत्र दिसले प्रियांका चोप्रा आणि निक जोनास! फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक्!!दोन वर्षांपासून हॉलिवूडमध्ये तळ ठोकून बसणारी प्रियांका लवकरच बॉलिवूडमध्ये वापसी करतेय. सलमान खान स्टारर ‘भारत’ या चित्रपटात प्रियांका दिसणार आहे. तूर्तास प्रियांका आणि अमेरिकन सिंगर निक जोनास यांच्या अफेअरच्या बातम्या सर्वत्र चर्चिल्या जात आहेत. दोघेही एकमेकांच्या प्रेमात असल्याचे मानले जात आहे. अर्थात अद्याप प्रियांकाने हे रिलेशनशिप मान्य केलेले नाही.