Join us
Daily Top 2Weekly Top 5

​प्रियांका चोप्राची उडाली झोप? जाणून घ्या का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2017 15:51 IST

प्रियांका चोप्रा सध्या जाम बिझी आहे. हॉलिवूडसोबत बॉलिवूड प्रोजेक्ट असा मोठ्ठा व्याप घेऊन सध्या ती जगतेय. खरे तर सध्या ...

प्रियांका चोप्रा सध्या जाम बिझी आहे. हॉलिवूडसोबत बॉलिवूड प्रोजेक्ट असा मोठ्ठा व्याप घेऊन सध्या ती जगतेय. खरे तर सध्या प्रियांकाजवळ कुठलाही बॉलिवूड सिनेमा नाही. पण आपल्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे बॉलिवूड आणि प्रादेशिक सिनेमांच्या निर्मितीचे तिचे काम जोरात सुरु आहे. याचकारणाने तूर्तास तिचा एक पाय अमेरिकेत अन् एक भारतात, असे होतेय. साहजिक याचा परिणाम व्हायचा तो झालाय. या प्रचंड बिझी शेड्यूलचा थेट परिणाम प्रियांकाच्या झोपेवर झालाय.}}}}सध्या माझी झोप उडालीय, असे प्रियांकाने म्हटलेय. विशेष म्हणजे, असे का होतेय, याचे कारण स्वत: प्रियांकालाही कळेनासे झाले आहे. twitterवर तिने लिहिलेय की, ‘ झोप येत नाही, तेव्हा माझ्या मेंदूत हजारो गोष्टींचे थैमान माजते. असे काय होतेय ठाऊक नाही. हा जेटलॅग(विमान प्रवासामुळे येणारा ताण)चा परिणाम आहे की, अत्याधिक थकव्याचा मला खरेच ठाऊक नाही.’ काल-परवाच प्रियांका भारतात आलीय. आता ती प्रोफेशनल कारणासाठी भारतात आली की, पर्सनल कारणांसाठी हे मात्र ठाऊक नाही. पण चर्चा तिच्या बॉलिवूड प्रोजेक्टला घेऊन आहे. चर्चा खरी मानाल तर  प्रियांका आपल्या चित्रपटासाठी हिरो शोधते आहे. प्रियांकाने संजय लीला भन्साळींचा ‘गुस्ताखियां’ हा चित्रपट साईन केलाय. याच चित्रपटासाठी लीडिंग हिरोचा शोध सुरु आहे. या शोधमोहिमेत प्रियांका स्वत: नको इतका इंटरेस्ट घेत आहे. याशिवाय सिक्कीम चित्रपट ‘पहुना’चे प्रमोशनही प्रियांका करणार आहे. टोरंटो फिल्म्स फेस्टिवलमध्ये या चित्रपटाचे प्रीमिअर आयोजित होणार आहे.ALSO READ : प्रियांका चोप्राच्या ‘स्कार्फ’वरून झाला ‘हंगामा’!!एकंदर काय तर हॉलिवूडमधून सुट्टी घेऊन प्रियांका भारतात आली असली तरी भारतातील तिचे सगळे शेड्यूल ठरलेले आहे.आता प्रियांका इतकी धावपळ करणार तर झोप तर उडणारच ना?