Join us

कंगना राणौतला सल्ला देणे प्रियंका चोपडाच्या बहिणीला पडले महागात, जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2017 17:36 IST

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमुळे कंगना राणौत सध्या इंडस्ट्रीमध्ये भलतीच चर्चेत आहे. मुलाखतीत तिने हृतिक रोशन, आदित्य पांचोली, अध्ययन ...

काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीमुळे कंगना राणौत सध्या इंडस्ट्रीमध्ये भलतीच चर्चेत आहे. मुलाखतीत तिने हृतिक रोशन, आदित्य पांचोली, अध्ययन सुमन आणि करण जोहर यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. तिच्या आरोपांमुळे सध्या बॉलिवूडमध्ये दोन गट पडले असून, कोणी कंगनाच्या समर्थनार्थ तर कोणी कंगनाचा विरोध करताना दिसत आहेत. आतापर्यंत या वादावर फराह खान, विद्या बालन, सोनम कपूर आणि प्रियंका चोपडा यांनी त्यांची मते मांडली आहेत. आता प्रियंकाची चुलत बहीण मीरा चोपडा हिनेही यावर तिची प्रतिक्रिया व्यक्त केली असून, तिने कंगनाला एक सल्ला दिला आहे. परंतु कंगनाला सल्ला देणे मीराला आता महागात पडल्याचे दिसून येत आहे. कारण कंगनाच्या चाहत्यांनी मीराला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. होय, मीराने कंगनाला सल्ला देताना म्हटले की, ‘मी कंगनाला खूप पसंत करते. परंतु आता जरा जास्तच झाले आहे. आता तिने तिच्या चित्रपटांविषयीच बोलायला हवे.’ मीराने ट्विटरच्या माध्यमातून कंगनाला अशाप्रकारचा सल्ला दिला आहे. तिने लिहिले की, ‘एक अभिनेत्री म्हणून आय रिअली लव्ह यू कंगना, मात्र आता तुझ्या पर्सनल आयुष्याविषयी जे काही होत आहे, ते जरा जास्तच होत आहे. आता तू थांबायला हवं, तुझ्या चित्रपटाला आता बोलू दे’ मीराने हे ट्विट करताच लोकांनी त्यास कॉमेंट्स देण्यास सुरुवात केली. एका यूजरने मीराची फिरकी घेताना लिहिले की, ‘तुझ्यावरही ही बाब लागू होऊ शकते. तू तुझ्या चित्रपटाला बोलू दे, तुझा अखेरचा हिट चित्रपट कोणता होता?’ मीरा ‘१९२० लंडन’ आणि ‘गॅँग्स आॅफ घोस्ट’मध्ये बघावयास मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच कंगनाच्या या मुलाखतीवर प्रियंका चोपडाला तिची प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. यावेळी प्रियंकाने म्हटले होते की, ‘मी माझ्या कामाविषयी खूप आनंदी आहे, त्यामुळे मी इतर गोष्टी माझ्या दुसºया प्रोजेक्ट्सचा भाग बनवू इच्छित नाही. मी एक निर्माती म्हणून काम करीत आहे. इतर कामांसाठी मी एक्सपटर््सबरोबर काम करू इच्छिते.’प्रियंकाने पुढे बोलताना म्हटले होते की, ‘मी असे कधीच फिल करीत नाही की, सर्वकाही मलाच करावे लागते. माझे नाव सर्वत्र असायला हवे. चित्रपट निर्मिती काही रॉकेट सायंस नाही. हा जॉब तर असा आहे की, तुम्ही काही ग्रीट लोकांबरोबर एकत्र येता आणि टीम म्हणून काम करता.’ यावेळी प्रियंकाने कंगनाच्या एका गोष्टींचे समर्थनही केले. तिने म्हटले की, ‘होय, काही दिग्दर्शकांमध्ये इगो असतो. केवळ दिग्दर्शकांमध्येच नव्हे तर इंडस्ट्रीमधील इतरही काही मोठ्या लोकांमध्ये अशाप्रकारचा इगो असतो. मी कोणालातरी सल्ला देऊ इच्छिते. जर त्याला तो योग्य वाटला तर त्यांनी तो घ्यायला हरकत नाही. मी टॉक्सिक इनवायमेंटमध्ये काम करू इच्छित नाही.’