Join us

Shocking - कुटुंबातील लोक काळी-काळी म्हणून हिणावायचे, तेव्हा प्रियंकाची व्हायची अशी अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 13:25 IST

तिला काळी म्हणून चिडविले जायचे.

प्रियंकाने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्येही स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. एक यशस्वी अभिनेत्री, यशस्वी गायिका, यशस्वी निर्माती म्हणून म्हणून प्रियंकाकडे पाहिले जाते. मात्र या प्रियंकाला एकेकाळी वर्णभेदाचा सामना करावा लागला होता. तिला काळी म्हणून चिडविले जायचे. ''माझी कायम इतर गोऱ्या मुलींशी तुलना व्हायची. ही तुलना मला खूप दुखवून जायची'' असा खुलासा प्रियंकाने एका मुलाखती दरम्याने केला होता. पुढे ती म्हणाली,'' वयाच्या 13 व्या वर्षी मी फेअरनेस क्रिम लावायची कारण मला गोरे व्हायचे होते.'' 

''मी एक वर्षापर्यंत फेअरनेस क्रिमची जाहिरात केली होती, कारण मला तेव्हा वाटले मी सुंदर आहे. पण मला ती जाहिरात नव्हती करायची आणि त्यानंतर मी ती जाहिरात नाही केली.'' 

 २००२ मध्ये तामिळ चित्रपट ‘थमिजहन’मधून अभिनयाची सुरुवात केली. २००३ मध्ये सनी देओलच्या ‘द हिरो- लव स्टोरी आॅफ ए स्पाय’मधून तिने बॉलिवूड डेब्यू केले. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार आणि चार श्रेणीत फिल्मफेअर पुरस्कार मिळवाणाºया प्रियांकाने अभिनयाच्या आपल्या १४ वर्षांच्या कारकिर्दीत हॉलिवूडपर्यंत मजल मारली. २००४ मध्ये ‘ऐतराज’मधील निगेटीव्ह रोलने प्रियांकाला खरी ओळख दिली. ‘डॉन’,‘कृष’ या चित्रपटानंतर ती बॉलिवूडच्या ए लिस्टमध्ये सामील झाली.

टॅग्स :प्रियंका चोप्रा