Join us

प्रियांका चोप्रा निर्मित 'पाहुना' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2018 20:06 IST

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या 'पर्पल पेबल प्रोडक्शन'चा 'पाहुना' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

ठळक मुद्दे'पाहुना: द लिटिल व्हिजिटर'मध्ये पालकांपासून दुरावलेल्या तीन लहान मुलांची कथा

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या 'पर्पल पेबल प्रोडक्शन'चा 'पाहुना' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. प्रियांका पहिल्यांदाच सिक्कीम भाषेतील चित्रपटाची निर्मिती करत आहेत. याआधी या प्रोडक्शन अंतर्गत मराठी, गुजराती भाषेतील चित्रपटांची निर्मिती करण्यात आली आहे. 'पाहुना: द लिटिल व्हिजिटर' असे या चित्रपटाचे नाव असून ७ डिसेंबरला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'पाहुना: द लिटिल व्हिजिटर' या चित्रपटात पालकांपासून दुरावलेल्या तीन लहान मुलांची कथा पाहायला मिळणार आहे. नेपाळमधल्या माओवाद्यांच्या कचाट्यातून सिक्कीमला आपल्या पालाकांसमवेत पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन मुलांची प्रेरणादायी कथा असणार आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाबाबतची माहिती खुद्द प्रियांका चोप्राने सोशल मीडियावर दिली आहे. तिने चित्रपटाचे पोस्टर शेअर करून लिहिले की, अखेर प्रतीक्षा संपली.  'पाहुना: द लिटिल व्हिजिटर' भारतातील सर्व चित्रपटगृहात ७ डिसेंबर, २०१८ला दाखल होणार आहे. हा खूप खास चित्रपट आहे.

जर्मनीमध्ये नुकत्याच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला दोन पुरस्कार मिळाले. पाखी टायरवालाने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा