Join us
Daily Top 2Weekly Top 5

अग्गंबाई सासूबाई ...! लेकाच्या लग्नाच्या वर्षभरानंतर समोर आली प्रियंका चोप्राच्या सासूबाईंची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2020 15:25 IST

लग्नातील मानपानावरून वधू पक्षावर वर पक्ष नाराज झाल्याच्या घटना खरे तर आपल्यासाठी नव्या नाहीत. पण प्रियंकाच्या लग्नाबद्दलही असे व्हावे?

ठळक मुद्देसासूबाईंच्या या नाराजीवर प्रियंकाने अद्याप कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही.

प्रियंका चोप्रा अणि निक जोनास यांनी 1 डिसेंबर 2018 रोजी लग्नगाठ बांधली. गत 1 डिसेंबरला या लग्नाला वर्ष पूर्ण झाले. पण या लग्नाच्या चर्चा मात्र अद्यापही थांबलेल्या नाहीत. जोधपूरच्या उमेद भवन पॅलेसमध्ये प्रियंका व निकचा शाही लग्न सोहळा पार पडला होता. या लग्नाने सर्वांचे लक्ष वेधले होते. केवळ भारतातच नाही तर परदेशातही या लग्नाची मोठी चर्चा झाली होती. पण आता या लग्नाच्या वर्षभरानंतर एक वेगळीच चर्चा रंगतेय. ती म्हणजे या शाही लग्नाबद्दलची प्रियंकाच्या सासू सास-यांची नाराजी.

लग्नातील मानपानावरून वधू पक्षावर वर पक्ष नाराज झाल्याच्या घटना खरे तर आपल्यासाठी नव्या नाहीत. पण प्रियंकाच्या लग्नाबद्दलही असे व्हावे, हे वाचून एकक्षण धक्का तर बसेल. पण हे खरे आहे. अलीकडे एका मुलाखतीत प्रियंकाचे सासरे पॉल केविन जोनास आणि सासूबाई डेनिस जोनास यानी प्रियंका-निकच्या लग्नाबद्दलचा अनुभव शेअर केला. विशेष म्हणजे, हा अनुभव शेअर करताना त्यांनी आपली एक नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली.

होय, प्रियंका व निकच्या ग्रँड वेडिंगचा थाट पाहून सगळ्यांचे डोळे दिपले पण प्रियंकाच्या सासूबाईंना मात्र या लग्नाचे फोटो अजिबात आवडले नाहीत. फोटाग्राफर्सनी हे शाही लग्न ज्याप्रकारे फोटोत कॅप्चर केले, त्याबद्दल त्या समाधानी नाहीत. त्यांच्या मते, हे लग्न इतक्या शाही पद्धतीने होऊनही फोटोग्राफर्सनी ते त्याप्रमाणे कॅप्चर केले नाही. अधिक भव्यदिव्य पद्धतीने हे लग्न कॅमे-यात कॅप्चर करता आले असते. लग्नाचा शाही थाट फोटोत दिसायला हवा होता, तसा दिसलाच नाही.सासूबाईंच्या या नाराजीवर प्रियंकाने अद्याप कुठलेही स्पष्टीकरण दिलेले नाही. वर्षभरानंतर समोर आलेली सासूबाईंची ही नाराजी प्रियंका कशी दूर करते ते बघूच.

टॅग्स :प्रियंका चोप्राप्रियांका चोप्रा आणि निक जोनास