Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रियंका चोप्राच्या कुटुंबियांना निक जोनस नाही तर या अभिनेत्याला बनवायचे होते जावई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2021 19:01 IST

प्रियंका चोप्राने एका मुलाखतीत तिच्या घरातल्यांना मालिकेतील या अभिनेत्याला जावई बनवायचे असल्याचे सांगितले.

बॉलिवूडची देसी गर्ल म्हणजेच अभिनेत्री प्रियंका चोप्रा नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. बऱ्याचदा ती तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत असते. प्रियंका चोप्राने हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक निक जोनससोबत लग्न केले. मात्र प्रियंकाच्या कुटुंबियाने तिच्यासाठी वेगळाच मुलगा पाहिला होता. याबाबतचा खुलासा प्रियंकाने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. 

एका मुलाखतीत प्रियांका चोप्राने सांगितले की, माझ्या मावशीची इच्छा होती की मी अभिनेता मोहित रैनाशी लग्न करावे. कारण त्यावेळी तो छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘देवों के देव महादेव’ या मालिकेत शंकर देवाची भूमिका साकारत होता. तो जशी भूमिका साकारत आहे तसाच खऱ्या आयुष्यातही असेल असे तिला सारखे वाटायचे. मोहित खूप शांत, प्रामाणिक असेल असे तिला वाटायचे. त्यामुळे तो माझ्यासाठी योग्य आहे असं ती म्हणायची.

ती पुढे म्हणाली की, ही गोष्ट नंतर मोहितला माहित पडली. त्याला मस्करीमध्ये याबाबत विचारण्यात आले तेव्हा त्याने ‘आता काय करु शकतो आपण?’ असे म्हटले होते.२०१७ पासून निक आणि प्रियांका एकमेकांना डेट करत आहेत. त्यानंतर त्यांनी साखरपूडा केला. २०१८मध्ये प्रियाकांने निक जोनासशी लग्न केले. त्यांचा लग्नसोहळा राजस्थान येथील जोधपुरमधल्या उमेद भवन राजवाड्यामध्ये पार पडला.

प्रियंका चोप्राच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर शेवटची ती 'द व्हाइट टाइगर' चित्रपटात दिसली होती. रमिन बहारानी दिग्दर्शित या चित्रपटात प्रियंकासोबत आदर्श गौरव आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत होते.

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनास