सलमान खानसोबत 'भारत'मध्ये प्रियांका चोप्राची एंट्री, याच वर्षी सुरु होणार शूटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 15:56 IST
सलमान खानचा आगामी चित्रपट भारतशी संबंधीत एक इटरेस्टिंग बातमीसमोर आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान पुन्हा एकदा प्रियांका ...
सलमान खानसोबत 'भारत'मध्ये प्रियांका चोप्राची एंट्री, याच वर्षी सुरु होणार शूटिंग
सलमान खानचा आगामी चित्रपट भारतशी संबंधीत एक इटरेस्टिंग बातमीसमोर आली आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सलमान खान पुन्हा एकदा प्रियांका चोप्रासोबत स्क्रिन शेअर करणार आहे. रिपोर्टनुसार प्रियांकाला या चित्रपटाची स्क्रिप्ट खूप आवडली आहे, लवकरच मेकर्स तिच्या नावाची घोषणा करू शकतात. प्रियांका नुकतेच अमेरिकन टीव्ही सिरीज 'क्वांटिको'चे शूटिंग संपवून भारतात परतली आहे. सोशल मीडियावर प्रियांकाने प्रियांकाने एक फोटो शेअर केला आहे ज्यात 6 स्क्रिप्टस दिसतायेत. गेल्या अनेक दिवसांपासून प्रियांका बॉलिवूडपासून लांब आहे. मधल्या काळात ती हॉलिवूड प्रोजेक्टसमध्ये बिझी होती. त्यामुळे हिंदी चित्रपट करायला तिच्याकडे वेळ नव्हता. डीएनएच्या रिपोर्टनुसार अली अब्बास जाफर दिग्दर्शित 'भारत' चित्रपटात सलमान खानच्या अपोझिट प्रियांकाला चोप्राला साईन करायची तयार सुरु आहे. जर प्रियांका चोप्रा या चित्रपटाचा भाग बनली तर दोन दशकानंतर सलमान आणि प्रियांकाची जोडी पुन्हा एकदा रसिकांना दिसणार आहे. याआधी 2008मध्ये 'गॉड तुसी ग्रेट हो'मध्ये एकत्र दिसले होते. ALSO READ : ‘क्वांटिको3’चे न्यूयॉर्कमधील शूटींग संपले! प्रियांका चोप्राने असा साजरा केला शेवटचा दिवस!!रसिकांना दोघांची केमिस्ट्री 'मुझसे शादी करोगे' या चित्रपटात देखील आवडली होती. प्रियांकाने याआधी अली अब्बास जफरसोबत 'गुंडे' चित्रपटात काम केले आहे. रिपोर्टनुसार काही दिवसांपूर्वी या चित्रपटासंदर्भात न्यूयॉर्कमध्ये अली अब्बासने प्रियांकाची भेट घेतली आहे. भारतची शूटिंग या वर्षाच्या मिडपर्यंत सुरू होऊ शकते. सध्या अली लंडनमध्ये चित्रपटाच्या लोकेशनसाठी फिरतो हे.अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या चित्रपटाचे प्लानिंग करतोय. यात सलमान 18 वर्षांचा दिसणार आहे. ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. मध्यंतरी प्रियांका ‘ऐतराज’च्या सीक्वलमधून बॉलिवूडमध्ये परतणार अशी बातमी होती.१४ वर्षांपूर्वी आलेल्या सुभाष घई निर्मित ‘ऐतराज’या थ्रीलर चित्रपटाला अब्बास मस्तान यांनी दिग्दर्शित केले होते.