Join us

प्रियांका चोप्राच्या 'सिटाडेल'चा फर्स्ट लूक रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2023 15:51 IST

Priyanka Chopra : प्रियांका चोप्राने अलीकडेच तिच्या बहुप्रतिक्षित वेब सीरिज 'सिटाडेल'चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. यातील तिच्या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा(Priyanka Chopra)ने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. नुकताच प्रियांकाच्या अ‍ॅक्शन-पॅक्ड स्पाय थ्रिलर 'सिटाडेल' सिरीजचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. यासोबतच या सीरिजच्या दोन एपिसोडचा एक्सक्लूसिव्ह प्रीमियर २८ एप्रिलला होणार असल्याची घोषणाही नुकतीच करण्यात आली आहे. २६ मे पर्यंत दर शुक्रवारी एक नवीन एपिसोड प्रदर्शित केला जाणार असल्याचेही घोषित करण्यात आले आहे. 

प्रियांकाने नुकताच तिच्या आगामी वेब सीरिज 'सिटाडेल'चा फर्स्ट लूक रिलीज केला आहे. फोटोंमध्ये प्रियांका रिव्हिलिंग रेड कलरच्या ड्रेसमध्ये अॅक्शन करताना दिसत आहे. या फोटोंमध्ये प्रियांका इतकी ग्लॅमरस दिसत आहे की तिचे चाहते तिच्या लुकचे खूप कौतुक करत आहेत. प्रियांका चोप्राने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच ती सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

डेव्हिड वील या लँडमार्क, हाय-टेक ड्रामाचे एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर आहेत यात प्रियांकाच्या जोडीला स्टेनली टुकी आणि लेस्ली मॅनव्हिल यांसह रिचर्ड मॅडन यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारल्या आहेत. या सीरीजमध्ये प्रियांका चोप्राने नादिया सिंगची भूमिका निभावली आहे. मेसन केनच्या भूमिकेत रिचर्ड मॅडेन, बर्नार्ड ऑरलिकच्या भूमिकेत स्टॅन्ली टुकी, डहलिया आर्चरच्या भूमिकेत लेस्ली मॅनव्हिल, कार्टर स्पेन्सच्या भूमिकेत ओसी इखिले, एब्बी कॉनरॉयच्या भूमिकेत ऍशले कमिंग्स, एंडर्स सिल्जेच्या भूमिकेत रोलँड मोलर आणि डेविक सिल्जे, काओलिन स्प्रिंगल हेंड्रिक्सने कॉनरॉयची भूमिका साकारली आहे. 

टॅग्स :प्रियंका चोप्रा