Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो..! प्रियंका चोप्राच्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडले होते कपाटात, मग घरातल्यांनी केले असे काही

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 18:16 IST

प्रियंका चोप्राचे नुकतेच अनफिनिश्ड हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. या पुस्तकात प्रियंकाने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा सध्या तिचे पुस्तक अनफिनिश्डमुळे चर्चेत आली आहे. या पुस्तकात प्रियंका चोप्राने तिच्या खासगी आणि प्रोफेशन लाइफबद्दल खुलासा केला आहे. अनफिनिश्ड पुस्तकात प्रियंकाच्या जीवनात आलेल्या कित्येक चढ-उतारांचा उल्लेख केला आहे.

प्रियंका चोप्राने अनफिनिश्ड पुस्तकात एक मजेदार किस्सा सांगितला आहे. या पुस्तकात प्रियंका चोप्राने म्हटले की, जेव्हा ती दहावी इयत्तेत शिकत होती त्यावेळी तिचे बॉब नामक एका मुलावर प्रेम होते. त्यावेळी प्रियंका अमेरिकेतील तिची मावशी किरणकडे राहत होती.

तारुण्यातील लव्हस्टोरी शेअर करत प्रियंकाने एक मजेशीर किस्सा सांगितला. ती म्हणाली की, एक दिवस बॉब तिला भेटायला घरी आला. दोघे हातात हात घालून सोफ्यावर बसून टीव्ही पाहत होते तितक्यात प्रियंकाने पायऱ्या चढून किरण मावशीला येताना पाहिले. या दरम्यान काय करायचे समजले नाही त्यामुळे प्रियंकाने बॉबला कपट्यात लपविले.

पुस्तकात प्रियंकाने सांगितले की, मावशी घरात आल्यावर सगळीकडे बारकाईने पाहत होती आणि मी बायलॉजीचे पुस्तक घेऊन बेडवर बसली होती. म्हणजे मावशीला वाटेल की अभ्यास करते आहे. तेव्हा अचानक मावशी माझ्या जवळ आली आणि बोलली हे खोल. मी बोलले हे खोलू. मावशीने पबोला कपाट उघड. मी यापूर्वी मी मावशीला कधीच इतके रागात पाहिले नव्हते. घाबरून माझा थरकाप उडला होता. मी कपाट उघडले आणि समोर बॉब दिसला.

प्रियंकाने पुढे सांगितले की, हे सर्व पाहून मावशीने लगेच आईला फोन लावला आणि सांगितले की मी त्यांना खोटे सांगितले.माझ्या कपाटातून एक मुलगा बाहेर पडला, अशी तक्रार आईकडे केली होती.

त्यानंतर प्रियंका भारत परत आली. इथे आल्यावर प्रियंकाने मिस वर्ल्ड स्पर्धेत भाग घेतला आणि मिस वर्ल्डचा किताब पटकावला. त्यानंतर प्रियंकाने कधीच मागे वळून पाहिले नाही. आज प्रियंका भारतातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे.

टॅग्स :प्रियंका चोप्रा