Join us

OMG!! प्रियांकाचं नाही तर दीपिकालाही ‘फॉलो’ करतोय निक जोनास!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2018 13:37 IST

अमेरिकेपासून तर भारतात मुंबईच्या रस्त्यावर निक व प्रियांका हातात हात घालून फिरताना दिसले. पण खरे मानाल तर निकची नजर प्रियांकावरचं नाही तर दीपिका पादुकोणवरही होती; किंबहुना आहे.

ठळक मुद्दे दीपिकाला फॉलो करण्यामागे निकचा काय उद्देश आहे, हे तर आम्हाला ठाऊक नाही. पण हो, त्याच्या या फॉलो करण्यामुळे सोशल मीडिया युजर्सला गॉसिप्सचा एक बहाणा नक्कीच मिळालाय.

 प्रियांका चोप्रा सतत चर्चेत आहे. याला दोन कारणे आहेत. एक म्हणजे, ‘भारत’ या चित्रपटातून तिची होत असलेली भारत वापसी आणि दुसरे म्हणजे, अमेरिकन सिंगर निक जोनास याच्यासोबतची तिची वाढती सलगी. प्रियांका व निक यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सध्या जोरात आहेत . अगदी अमेरिकेपासून तर भारतात मुंबईच्या रस्त्यावर निक व प्रियांका हातात हात घालून फिरताना दिसले. पण खरे मानाल तर निकची नजर प्रियांकावरचं नाही तर दीपिका पादुकोणवरही होती; किंबहुना आहे आणि याचा सगळ्यांत मोठा पुरावा म्हणजे, निकचे इन्स्टाग्राम अकाऊंट. होय, निकच्या इन्स्टाग्राम अकाऊंटला तुम्ही भेट दिल्यास तुम्हाला एक गोष्ट जरूर दिसेल. ती म्हणजे, निक दीपिका पादुकोण हिलाही फॉलो करतोयं.

प्रियांका चोप्राने ‘बेवॉच’मधून आपला हॉलिवूड डेब्यू केला होता तर दीपिकाने ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ जेंडर केज’ या चित्रपटाद्वारे हॉलिवूडमध्ये सुरूवात केली होती. २०१७ च्या फोर्ब्सची यादी तुम्हाला आठवत असेल तर यात प्रियांका चोप्रा बॉलिवूडची सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री होती तर दीपिका या यादीत दुस-या क्रमांकावर होती. आता दीपिकाला फॉलो करण्यामागे निकचा काय उद्देश आहे, हे तर आम्हाला ठाऊक नाही. पण हो, त्याच्या या फॉलो करण्यामुळे सोशल मीडिया युजर्सला गॉसिप्सचा एक बहाणा नक्कीच मिळालाय. हे गॉसिप्स पीसीच्या कानावर जावू नये, म्हणजे मिळवले.

गत रविवारी प्रियांका तिचा कथित बॉयफ्रेन्ड निक जोनास,  चुलत बहिण परिणीती चोप्रा, भाऊ सिद्धार्थ यांच्यासोबत गोव्यास रवाना झाली होती. येथे सुट्टी एन्जॉय केल्यानंतर लवकरच प्रियांका निकसोबत अमेरिकेला रवाना होईल, असा अंदाज आहे. पण भारतात आणखी काही दिवस प्रियांका व निकच्या कथित रोमान्सच्या बातम्या चवीने चघळल्या जाणार आहेत...

टॅग्स :प्रियंका चोप्रानिक जोनासदीपिका पादुकोणबॉलिवूडहॉलिवूड